रोहा अष्टमीत गौरी गणपती विसर्जनानंतर गौरा नाचवण्याची परंपरा.

रोहा अष्टमीत गौरी गणपती विसर्जनानंतर गौरा नाचवण्याची परंपरा.
कोलाड -कल्पेश पवार :-
रोह्यात गौरी गणपती विसर्जनाच्या दूसऱ्या दिवशी गौरा नाचवण्याची परंपरा आहे.रोहयाच्या धगरआळी आणि अष्टमीतील मराठा आळीत ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे.
गौरा पार्वतीचा काका असल्याची आख्यायिका आहे, पिढ्यानपिढ्या गौरा बसविण्याची व नाचवण्याची पारंपरिक परंपरा रोहा शहरातील धनगरआळी आणि अष्टमी मराठाआळी ग्रामस्थांनी आजही जपलेली आहे.गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरा धनगर आळीचे पाटील वसंत काफरे यांच्या मानाच्या गणपतीच्या ठिकाणी विराजमान केला जातो. गावात वाजत गाजत गौरा डोक्यावर नाचवण्याचा मान वखारदार कुटुंबाकडे आहे.हा गौरा नवसाला पावणारा असल्याने अनेक जण आपला नवस त्याच्या समोर फेडत असतात.त्याच दिवशी गौराचे शहरातील मानाच्या गणपती बरोबर विसर्जन केले जाते.धनगर आळीत पार्वतीचा काका, गौरा बनविण्याचे व नाचविण्याचे मानकरी वखारदार कुटुंब गौराची मूर्ती तयार करतात.पेंड्यापासून बनवलेल्या गौऱ्याच्या मूर्तीला कपडे व मुखवटा लावून सजविले जाते. त्यांना खुर्चीत बसवून मानाच्या गणरायासमोर विराजमान केले जाते. मानाच्या गणपती विसर्जना वेळी मानकरी वखारदार कुटुंबातील सदस्य संतोष वखारदार गौरा डोक्यावर घेऊन रोहा शहरात नाचवीत असतात.यापूर्वी त्यांचे वडील बाळा वखारदार गौरा नाचवीत होते.ही परंपरा त्यांच्या मुलांनी आजही सुरू ठेवलेली आहे.अष्टमीतील मराठा आळीत गजानन चव्हाण यांच्या घरी हे गौरा उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा लेझीमचा ठेका धरत गौरा महाराजांची मिरवणूक अष्टमीत निघालेली, रोहा अष्टमीत ग्रामस्थ मोठ्या संख्येने हा गौरा उत्सव पाहण्यासाठी एकच गर्दी करीत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *