कोलाड विभागात पाच दिवसाच्या ११३८ गणपतींचे तर २५४ गौवरीचे -भक्तीमय वातावरणात विसर्जन ;

कोलाड विभागात पाच दिवसाच्या ११३८ गणपतींचे तर २५४ गौवरीचे  -भक्तीमय वातावरणात विसर्जन ;
कोलाड दि.२३( कल्पेश पवार  )
                गणेश चतुर्थीच्या दिवशी मंगळवारी बाप्पांच्या आगमना पासून ते पाच दिवसांच्या विसर्जनातही रिमझिम सह सुरू असलेल्या पावसामुळे भक्तगणांचा थोडा हिरमोड झाला होता.तरिही टाळ,मृदुंगाच्या गजरात पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत भक्तगणांनीआवडत्या बाप्पाला व मोठ्या जल्लोषात गौराईना निरोप दिला.यावेळी कोलाड ,खांब, सुतार वाडी परिसरात विसर्जन स्थळांवार मोठी गर्दी झाली होती.    

गणेश चतुर्थीच्या मोठ्या आनंददायी वातावरणात गणरायाची घरोघरी स्थापना केल्यानंतर यावर्षी मोठया प्रमाणावर पाऊसाची संतधार सुरूच होती.परंतु या पावसात सुद्धा आपल्या बाप्पाच्या आगमनानंतर गणेश भक्तांनी दररोज मनोभावे पूजन, भजन, आरती, जागर आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम केले.तर भक्तांच्या डोक्यावर पाऊसाचे सावट असताना देखील कोलाड विभागातील एकूण घरगुती गणपती ११३८ व २५४ गौवराई ना तमाम गणेशभक्तानी भक्तीमय वातावरणात निरोप दिला आहे.
                     यावेळी कोलाड विभागात कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी कोलाड चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी विसर्जन मार्गावर आणि नदी किनारी चोख बंदोबस्त ठेवले होते.यावेळी नरेश पाटील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *