सुरेश महाबळे यांची कलगीतुरा समन्वय समितीच्या अध्यक्षपदी निवड

सुरेश महाबळे यांची कलगीतुरा समन्वय समितीच्या अध्यक्षपदी निवड
कोलाड-कल्पेश पवार
            कोलाड आंबेवाडी येथील सरपंच असलेले सुरेश महाबळे यांची कलगीतुरा रायगड रत्नागिरी समन्वय समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
                 माणगाव येथे झालेल्या कलगीतुरा कलाकारांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.असून या वेळी सभेला संदीप म्हस्के,पोपट पोटले,रमेश जाधव,रामभाऊ टेंबे, शंकर तुर्डे, प्रल्हाद शिरशिवकर,अंकुश जाधव,सहदेव उत्तेकर, वामन बैकर,दीपक भोस्तेकर, ज्ञानेश्वर महाबळे ,संतोष भात्रे, सचिन माळी, दत्ताजी रायगड, रत्नागिरी सहकोकणातील सुतार, दीपक भोस्तेकर आदी लोक कलाकार तसेच सदालाल घराणे, भानुदास घराणे,संभुराजू घराणे,गुरू गणपती घराणे, रामचंद्र पंडित ताडदेव घराणेचे प्रमुख शाहीर मंडळी
उपस्थितीत होते.
          लोक कलाकारांना प्रोत्साहन व ही लोककला अधिक वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने व कला सादरीकरण करताना होणार अन्याय दूर करून समन्वय ठेवण्यासाठी या समितीची स्थापना करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *