कोलाड : कल्पेश पवार
रोहा धाटाव औद्योगिक विद्यालयात तालुका स्तरीय खोखो स्पर्धेचा थरार पहायला मिळाला. तालुक्यातील 25 शाळा सहभागी झाल्या असून 14, 17 व 19 वयोगटातील 60 संघानी आपला सहभाग नोंदवीला होता. या स्पर्धेत सानेगुरुजी विद्यानिकेतन मुलांमध्ये प्रथम तर रा. ग. पोटफोडे मास्तर खांब शाळा मुलींमध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. तसेच शासकीय आश्रम शाळा सनेगाव ही शाळा द्वितीय क्रमांकाची माणकरी ठरली. विजयी व उपविजयी संघांचे तालुक्यातील सर्व स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. धाटाव औद्योगिक विद्यालयाच्या मैदानावर नुकत्याच या स्पर्धा पार पडल्या. पहिल्यांदाच धाटाव हायस्कुलमध्ये स्पर्धा झाल्याने विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी धाटाव ग्रामपंचायत उपसरपंच अशोक मोरे, धाटाव औद्योगिक विद्यालयायचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील, मुख्याध्यापक गोरीवले सर, सुरेश जंगम, मधुकर फसाळे अडसूल सर, पानसरे सर, दीपक जगताप सर, क्रीडा समन्वयक रविंद्र कान्हेकर, क्रीडा शिक्षक सचिन महाडिक, सुधीर जंगम, मीनानाथ गावंड, विशाल शिंदे, ज्ञानेश्वर पोटफोडे, अमोघसिद्ध सुरवसे, सुनील थिटे, विनायक चितलकर, निलेश बिरगावले, गोविंद कवलगे, नरेश महाडिक, समिता वाघमारे, श्रद्धा पाटील,योगेश धुमाळ, नितीश म्हात्रे, शिवाजी मेंढे, मंगेश कुर्ले, संघ व्यवस्थापक, सहकारी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोहा तालुका स्तर खोखो स्पर्धा निकाल
14 वर्षे मुली प्रथम क्रमांक रा.ग. पोटफोडे मास्तर विद्यालय खांब, द्वितीय क्रमांक एमपीएससी कोलाड, 14 वर्षे मुले प्रथम क्रमांक साने गुरुजी विद्यानिकेतन सानेगाव, द्वितीय क्रमांक शासकीय आश्रम शाळा सानेगाव, 17 वर्षे वयोगट मुली प्रथम क्रमांक रा.ग.पोटफोडे मास्तर विद्यालय खांब, द्वितीय क्रमांक दगड तटकरे माध्यमिक विद्यालय विरजोली, 17 वर्षे मुले प्रथम क्रमांक साने गुरुजी विद्यानिकेतन सानेगाव, द्वितीय क्रमांक शासकीय आश्रम शाळा सानेगाव, 19 वर्षे मुली प्रथम क्रमांक जिंदल माऊंट लिटर जी स्कूल सुकेळी, द्वितीय क्रमांक मेंदळे हायस्कूल रोहा या शाळांनी पटकवीला.
रोहा तालुका खो खो पंच म्हणून विशाल शिंदे, मीनानाथ गावंड, सुधीर जंगम, सचिन महाडिक, तुषार ठमके, राज देशमुख, विक्रांत शिंदे यांनी चोख भूमिका बजावली.पंचांनी स्पर्धा यशस्वी पार पडल्याने तालुका समन्वयक रवींद्र कान्हेकर यांनी त्यांचा सन्मान केला.