रोहा-कोलाड रोडवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून लाखोंचा अंमलीपदार्थ जप्त; दोन आरोपींना अटक
कोलाड-कल्पेश पवार
रोहा-कोलाड रस्त्यावर असणा-या मराठा पॅलेस हॉटेलजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडच्या पथकाने अंमली पदार्थ जप्त करीत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
रोहा तालुक्यातील रोहा-कोलाड रस्त्यावरील मराठा पॅलेस हॉटेलजवळ एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबऱ्यां मार्फत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला प्राप्त झाली होती. पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे, तसेच पोनि/श्री.बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, यांच्या मार्गदर्श नाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश कदम, सहाय्यक फौजदार दिपक मोरे, पोहवा/विकास खैरनार, पोहवा/रुपेश निगडे, पोहवा/सुदीप पहेलकर, पोशि/अक्षय जगताप, पोशि/स्वामी गावंड, पोशि/ओमकार सोंडकर या पथकाने गोपनीय माहितीचे आधारे सापळा रचून कारवाई केली असता एकूण 5,34,000/-रुपये किमतीचा चरस हा अंमली पदार्थ एकूण 1068 ग्रॅम वजनाचा प्रति ग्रॅम 500/- रुपये प्रमाणे जप्त केले आहे. यावेळी आरोपीत 1) वय 26 वर्ष, 2) वय-30 वर्ष दोन्ही रा.जीवनाबंदर,श्रीवर्धन, ता.श्रीवर्धन, जि.रायगड यांना अटक केली आहे.
याप्रकरणी कोलाड पोलीस ठाणे गु.र.नं. 91/2023 एनडीपीएस कायदा 1985 चे कलम 8 (क), 20 (ब), II (क) अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि/श्री.अजित साबळे हे करीत आहेत.
जन संपर्क अधिकारी
पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड