गोवे ग्रामपंचायतीला ISO मानांकन प्राप्त
                

गोवे ग्रामपंचायतीला ISO मानांकन प्राप्त – सरपंच  महेंद्र पोटफोडे यांच्या पाठपुराव्याला यश !
कोलाड – कल्पेश पवार
                 अवघ्या काही महिन्यांतचं चेहरा मोहरा बदललेल्या ग्रुप ग्रामपंचायत गोवे ही विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असून,सरपंच महेंद्र पोटफोडे यांच्या पाठपुराव्यामुले ग्रामपंचायतीला ISO मानांकन मिळाले आहे.
गोवे ग्रामपंचायतीला ISO मानांकन देते वेळी,
डॉ.किरण भगत,सरपंच महेंद्र पोटफोडे,उपसरपंच रंजिता जाधव,ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पवार,नितीन जाधव सुप्रिया जाधव,अंजली पिंपळकर,निशा जवके, भावना कापसे,ग्रामसेवक गोविंद शिद,संदिप जाधव,
लहू पिंपलकर,राजेंद्र जाधव,तंटामुक्त अध्यक्ष प्रवीण पवार,भरत कापसे, गायकवाड उपस्थित होते.
               रोहे तालुक्यातील कित्येक वर्षे दुर्लक्षित असलेल्या गोवे ग्रामपंचायत मध्ये डॅशिंग नेतृत्व महेंद्र दादा पोटफोडे हे सरपंच झाल्या पासून गोवे,मुठवली, शिरवली,या तिन्ही गावांचा झपाट्याने विकास होत चालला आहे.या तिन्ही गावात नाविन्यपूर्ण योजना महेंद्र पोटफोडे हे आणीत आहेत.मागिल वर्षी नवरात्र उत्सव निमित्ताने सरपंच महेंद्र पोटफोडे यांनी लवकरच ग्राम पंचायत ही ISO करू असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते.त्याची पूर्तता करीत गोवे ग्रामपंचायत ला ISO मानांकन प्राप्त झाले आहे.आयएसओ -International
Organization for Standardization यालाच मराठी मध्ये आंतरराष्ट्रीय मानकीकरण संघटना असे म्हणत असून या माध्यमातून ग्रामपंचायत ही डिझिटल होत असून आता रहिवासी दाखला,जन्म दाखला,मृत्यू दाखला असे अनेक दाखले एक क्यू आर कोड स्कॅन केल्यावर चुटकीसरशी मिळणार आहे.गोवे ग्रामपंचायत ला ISO मिळाल्याबद्दल गोवे, मुठवली,शिरवळी ग्रामस्थांनी सरपंच महेंद्र पोटफोडे यांचे आभार मानले आहेत.तर यावेळी मुठवली येथील अभिजीत गायकवाड यांनी वकिल पदवी घेतल्याने त्याला ग्रामपंचायतीच्या वतीने शुभेच्छा दिल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *