तिसे येथे दरड कोसळली
प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविलं

तिसे येथे दरड कोसळली
प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविलं
कोलाड-कल्पेश पवार
               रोहे तालुक्यातील मौजे तिसे येथे काळ शुक्रवार रोजी सायंकाळच्या सुमारास गावात एका घरावर डोंगराचा काही भाग ढासळला.परंतु सुदैवाने कोणती जिवित हानी झाली नसून प्रशासनाने गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविलं …
         शुक्रवार दि.८ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस पडत असल्याने सायंकाळ 5च्या सुमारास दरडप्रवण  तिसे गावांतील चंद्रकांत धोंडू मुरकर यांचे घर क्रमांक.60 अ वर डोंगरातून माती,दगड येवून भिंतीवर आदळले यात घराचे नुकसान झाले असून,येथील घरातील कुटुंब नागरिकांना ग्रामस्थ नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.तर जवळच्या ७०/८०घरांतील नागकांना
गावातील मंदिर व शाळेत प्रशासनाने सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.
                 या घटनेची माहिती मिळताच आ.अनिकेत तटकरे, कोलाड पोलिस अधिकारी अजित साबळे,रोहा प्रांत अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड,तहसीदार देशमुख,गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे ,मंडल अधिकारी गुंड,तलाठी केंद्रे,गावातील सरपंच यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थांना दिलासा देत सुरक्षेतेची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *