गोवे ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्षपदी प्रवीण पवार यांची निवड 

गोवे ग्रामपंचायत तंटामुक्त अध्यक्षपदी प्रवीण पवार यांची निवड
कोलाड,दि.०६( कल्पेश पवार ) 
                     रोहे तालुक्यातील गोवे ग्रा.पंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते प्रविण महादेव पवार यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. 
                     गोवे ग्रा.पंचायतीची ग्रामसभा नुकतीच संपन्न करण्यात आली.या सभेच्या वेळी प्रविण महादेव पवार यांची तंटामुक्त अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
गोवे गावातील प्रवीण पवार हे सौमजाई ग्रामस्थ मंडळ गोवे चे माजी अध्यक्ष राहिले असून ते सामाजिक धार्मिक, सांस्कृतिक तथा अध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर असून गावाच्या विकासात आवर्जून पुढाकार घेणारे  म्हणून ओळखले जातात.त्यांनी गावातील,परिवारातील
अनेक तंटे मिटवले आहेत.त्यांचा गावांत पवार परिवारात मोठा दबदबा असून ग्रामसभे वेळी सूचक श्रीधर गुजर यानी त्यांचे नाव सुचवले असून त्याना सर्वानुमते लहू पिंपलकर यांनी अनुमोदन दिले.पवार यांची निवड होताच ग्रामपंचायत चे सरपंच सरपंच महेंद्र पोटफोडे,उपसरपंच रंजिता जाधव,नरेंद्र जाधव,संदीप जाधव,
सदस्य,नरेंद्र पवार,नितीन जाधव सुप्रिया जाधव,अंजली पिंपळकर,निशा जवके,भावना कापसे,लहू पिंपलकर, राजेंद्र जाधव,ग्रामसेवक गोविंद शिद यांच्या सह गोवे, मुठवली, शिरवली, ग्रामस्थ यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *