कोलाड  नाक्यावर सकल हिंदू समाज कडून निषेध व्यक्त !

महाड-राजेवाडी येथील झालेल्या प्रकाराचा कोलाड  नाक्यावर सकल हिंदू समाज कडून निषेध व्यक्त !
कोलाड -कल्पेश पवार
                  महाड-राजेवाडी येथील झालेल्या प्रकाराचा कोलाड नाक्यावर द.ग.तटकरे चौक – आंबेवाडी नाका. येथे जय श्री राम च्या घोषणा देत सकल हिंदू समाज कडून निषेध व्यक्त करण्यात आले.
                  ३१ ऑगस्ट २०२३ रोजी महाड – राजेवाडी येथे गोवंश हत्येचा प्रकार झाला होता.यावेळी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस आणि पत्रकार मित्रांवर भ्याड हल्ला करण्यात आला.या घटनेचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रात उमटले असून कोलाड नाक्यावर द.ग.तटकरे चौक – आंबेवाडी नाका.येथे साय.४ वाजता सकल हिंदू समाज कडून निषेध व्यक्त करण्यात आले.तसेच
समाजात तेढ निर्माण करण्याऱ्या अशा घटनांंना आळा घालण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *