रोहा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने नृत्य स्पर्धेचे आयोजन

रोहा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने
नृत्य स्पर्धेचे आयोजन
कोलाड-कल्पेश पवार
           राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी रोहा तालुका व रोहा अष्टमी शहर यांच्या वतीने शुक्रवार दि.८ सप्टेंबर रोजी दु.३ वाजता मातोश्री मंगल कार्यालय,रोहा येथे भव्य श्रावणसरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावे असे आहवान आयोजकांन कडून करण्यात आले आहे.
खा.सुनील तटकरे,आअनिकेत तटकरे,महिला,बालविकास मंत्री अदिती तटकरे,यांच्या मार्गदर्शनाखाली,मधुकर पाटील रायगड जिल्हा अध्यक्ष रा.कॉ,पक्ष,उमा मुंढे जिल्हाध्यक्षा, रायगड रा.कॉ,पक्ष, प्रीतम पाटील,तालुका अध्यक्षा, रा.कॉ,पक्ष,प्राजक्ता चव्हाण,शहर अध्यक्षा,रा.कॉ,पक्ष,हे नियोजन करीत आहे.
            पवित्र श्रावण महिन्यात खास महिलांकरिता त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी रोहा तालुका व रोहा अष्टमी शहर यांच्या वतीने भव्य श्रावणसरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यावेळी प्रथम क्रमांक १०,०००/- व सन्मानचिन्ह ,द्वितीय क्रमांक ७०००/- व सन्मानचिन्ह,तृतीय क्रमांक ५०००/- व सन्मानचिन्ह,उत्तेजनार्थ १ व २ प्रत्येकी २०००/- व सन्मानचिन्ह,तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.
तरी या स्पर्धेत नियम व अटी पुढील प्रमाणे असून
१. एका ग्रुपमध्ये जास्तीत जास्त १२ स्पर्धक महिला असाव्यात.२.प्रत्येक गटाला सादरीकरणासाठी ०७ मिनिटांचा अवधी दिला जाईल.३.नृत्यासाठी लागणारे वाद्यवृंद व इतर साहित्य हे स्पर्धकांनी स्वतःहा आणावेत.४.एक स्पर्धक एकाच वेळी एका ग्रुप मध्ये भाग घेऊ शकतो.५.परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.अधिक माहिती साठी राधा मोहिते 9819753876,मनीषा नागावकर 7769810497,असावरी मोकल 7887357791,यामिनी पाटील 8975011468
संध्या पिंपळे 8378941611 यांच्या जवळ संपर्क साधावा .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *