अखेर बल्हे येथील पाण्याची टाकी जमीनदोस्त !
सामाजिक कार्यकर्ते रवींद्रशेट तारू यांच्या पाठपुराव्याला यश !

अखेर बल्हे येथील पाण्याची टाकी जमीनदोस्त !
सामाजिक कार्यकर्ते रवींद्रशेट तारू यांच्या पाठपुराव्याला यश !
कोलाड- कल्पेश पवार
                 रोहे तालुक्यातील जल जीवन मिशन योजना अंतर्गत मौजे बल्हे येथे पाण्याच्या टाकीचे काम चालू असून ते काम अत्यंत निष्कृष्ठ (खराब) दर्जाचे चालले आहे.तरीते रद्द करून नव्याने टाकी बांधण्यात यावे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र शेट तारू यांनी ग्रामीण पाणी पुरवठा रा जि प उप विभाग रोहा यांना निवेदन देऊन केली होती.याची त्वरित दखल घेत निष्कृष्ठ दर्जाची चालू असेलेली पाण्याची टाकी जमीनदोस्त केली असून येथे नव्याने अत्यंत चांगल्या दर्जाची टाकी आता उभारली जाणार आहे.त्यामुळे ग्रामस्थांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
                    ग्रुप ग्राम पंचायत चिंचवली तर्फे आतोणे येथील मौजे बल्हे येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर होऊन येथे पाण्याच्या टाकीचे काम चालू आहे.परंतू हे काम अत्यंत निष्कृष्ठ (खराब) दर्जाचे झाले आहे .ते तरी ते रद्द करून नव्याने टाकी बांधण्यात यावी अशी मागणी येथील रविंद्र काशिनाथ तारू अध्यक्ष तंटामुक्ती ग्रुप ग्राम पंचायत चिंचवली तर्फे आतोने यांनी ग्रामीण पाणी पुरवठा रा जि प उप विभाग रोहा यांना निवेदन करून दिली होती.या निवेदनाची दखल घेत चालू काम असलेली पाण्याची टाकी जमीनदोस्त करण्यात आली असून, येथे आता नविन टाकी उभारली जाणार आहे.
         बल्हे येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्रशेट तारू यांच्या पाठपुराव्याला यश आले असून,गावातील मंडळी संतोष शिर्के,संजय मुसळे ,प्रकाश शेलार,चंद्रकांत सासके ,व महिला वर्ग यांच्यात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *