पोलिसांना राख्याबांधून रक्षाबंधन साजरा !

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील महिलांनी
पोलिसांना राख्याबांधून केला रक्षाबंधन साजरा !
कोलाड-कल्पेश पवार
                  ‘एक धागा मायेचा’ रोहा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे कोलाड पोलिस स्टेशन येथे आपले कर्तव्य बजावत असणारे सर्व पोलिस बांधव यांचे सर्व महिलांनी राखी बांधुन हा भाऊ बहिणीचा सण साजरा केला.
रोहा तालुका महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मा.खासदार मा.सुनील तटकरे साहेब, महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे व आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच समाजोपयोगी कार्य करित आहे.नवनवीन उपक्रम राबवित आहेत.आपले श्रावण महिन्यातले सण साजरे करत असताना आज रक्षाबंधनाचा सण आपल्या पोलीस बांधवाना राखी बांधुन साजरा करण्यात आला.पोलिस बांधव आपले रक्षण रात्रंदिवस करित त्यांचे कर्तव्य बजावत असतात. म्हणूनच महिलांनी आपले कर्तव्य म्हणून म्हणुन हा रक्षाबंधनाचा सण कोलाड पोलीस स्टेशन येथे जाऊन साजरा केला. कोलाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.अजित साबळे यांच्या प्रमुख उपस्थिततीत हा कार्यक्रम झाला.
यावेळी रोहा तालुका महिला अध्यक्षा प्रितम पाटील,कोलाड पोलीस स्टेशन चे सर्व स्टाफ,कोलाड सरपंच शर्मिला सागवेकर,सुरेखा पार्टे,रेश्मा कोदे,अपर्णा देशमुख,राधा मोहिते,सारिका खंडागळे,अपर्णा लोखंडे.अस्मिता कडव,तसेच तालुक्यातील महिला वर्ग उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *