रेल्वे गेटमन खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ८ विशेष पोलीस पथके तैनात
घटनेला २४ तास उलटून गेले तरी मारेकरी अद्याप फरार ; पोलिसांपुढे आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान ;

रेल्वे गेटमन खून प्रकरणाचा छडा लावण्यासाठी ८ विशेष पोलीस पथके तैनात
घटनेला २४ तास उलटून गेले तरी मारेकरी अद्याप फरार ; पोलिसांपुढे आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान ;
जो पर्यंत मारेकरी मिळत नाही तो पर्यंत कांबळे यांचे शेव ताब्यात घेणार नाही!
घटनेने आंबेडकरी बहुजन समाज आक्रमक!  
कोलाड बाजारपेठ मंगळवारी होती बंद      
कोलाड दि. २२ ऑग. कल्पेश पवार  :-
                 रेल्वे गेटमन चंद्रकांत कांबळे यांची सोमवारी अज्ञात मारेकऱ्याने डोक्यात गोळी घालून निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. यां घटनेला २४ तास उलटून गेले तरी खुनी व्यक्तीचा थांगपत्ता लागत नाही.फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी व खुनाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून जिल्हा पोलिस प्रशासनाकडून ८ विशेष पोलीस पथक थैनात करण्यात आले आहेत. जो पर्यंत मारेकरी मिळत नाही तो पर्यंत कांबळे यांचे शेव ताब्यात घेणार नाही, अशी ठाम मागणी करीत आंबेडकरी बहुजन समाज आक्रमक झाले असून या घटनेच्या पाश्वभूमीवर कोलाड बाजारपेठ मंगळवारी बंद ठेवण्यात आली होती.
                  रोहा तालुक्यातील कोलाड जवळील तिसे गावाच्या रेल्वे फाटकावर गेटमन म्हणुन रुजू असलेले चंद्रकांत कांबळे ( रा. पाले खुर्द ता. रोहा ) हे आपले कर्तव्य बजावत असताना सोमवारी दुपारी २ वा. च्या सुमारास अज्ञात मारेकऱ्याने त्यांची गोळी झाडून निर्घृण हत्या केली. या घटनेचे वृत्त समजताच अप्पर पोलीस अधीक्षक अतुलकुमार झेंडे यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीची धरपकड करण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. अज्ञात आरोपीने चंद्रकांत कांबळे यांचा खून करण्यापूर्वी पूर्व नियोजित कट रचला असून ते ड्युटीवर एकटेच असतात तसेच ज्यावेळी तिसे रेल्वे फाटकावर गावाकऱ्यांची वर्दळ नसते अशा दुपारच्या वेळेतच त्यांना गोळी घातली गेली.अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने कांबळे यांचा खून करण्यात आला आहे. कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते.नुकताच झालेल्या रेल्वे संघटनेच्या निवडणुकीत त्यांनी आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले होते.पूर्व वैम्यनस्यातून त्यांची हत्या करणायत आली असावी अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.               दरम्यान या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक अतुलकुमार झेंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन खुनाचा छडा लावण्यासाठी फॉरेन्सिक टीम,डॉग स्कॉड, आरसिपी,बीडीडीएस टीम, फिंगर एक्सपर्ट टीम या सर्व टीमला पाचारण करून त्यांच्या मार्फत घटनास्थळी तपासणी केली आहे. घटनास्थळाचे बाजूला असणारे नाल्यांमध्ये व आजूबाजूचे परिसरात स्थानिक आपत्ती व्यवस्थापनचे महेश सानप याची रेस्क्यू टीम कोलाडचे मदतीने सर्च ऑपरेशन सुरू आहे. ८ विशेष पोलीस पथकांची नेमणूक करून सर्व यंत्रणेला तपास कार्याला लावली आहे.
या घटनेचा बौध्द समाज व बहुजन समाज बांधवांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
जो पर्यंत मारेकरी मिळत नाही तो पर्यंत कांबळे यांचे शेव ताब्यात घेणार नाही या मागणीवर आंबेडकरी कार्यकर्ते ठाम आहेत, यां दुर्देवी घटनेत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याची हत्या झालेल्या निषेधार्थ येथील व्यापारी बांधवांनी मंगळवारी दिवसभर बाजारपेठ बंद ठेवली आहे.         
प्रतिक्रिया :
चंद्रकांत कांबळे यांच्या मारेकऱ्याला जोपर्यंत अटक करत नाहीत, तोपर्यंत आम्ही मयत कांबळे यांचा शव ताब्यात घेणार नाही.
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याची अशी दिवसाढवळ्या हत्या व्हावी हे भयानक आहे. फरार मारेकराचा शोध लागलाच पाहिजे. !”
भाई जाधव -दलीत पँथर युथ अध्यक्ष, महाराष्ट्र
२)चंद्रकांत कांबळे हे आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. तसेच ते कोकण रेल्वे कर्मचारी संघटनेवर पदाधिकारी म्हणुन काम करत होते. तसेच कोलाड विभाग बौध्द समाज कार्याध्यक्ष म्हणुन काम करीत होते. या घटनेची सखोल चौकशी करून आरोपीला बेड्या ठोकण्यात याव्या.
राकेश कांबळे सरपंच तिसे ग्रामपंचायत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *