धक्कादायक कोलाड तिसे येथील रेल्वे फाटकावर गोळीबार ! गेटमन ला गोळी मारून आरोपी फरार

धक्कादायक कोलाड तिसे येथील रेल्वे फाटकावर गोळीबार ! गेटमन ला गोळी मारून आरोपी फरार
कोलाड-रोहा- (कल्पेश पवार)
कोलाड तिसे रेल्वे फाटकावर सोमवारी दुपारी गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली.
रेल्वे फाटकावर गेटमन म्हणून कामावर असलेले चंद्रकांत कांबळे यांच्यावर अज्ञात ईसमाने गोळीबार केला.कपाळाला गोळी लागल्याने चंद्रकांत कांबळे अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात पडले,त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
चंद्रकांत कांबळे यांच्यावर अज्ञात व्यक्तीने गोळीबार करून पोबारा केला.या अनपेक्षीत घटनेने संबंध जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली.दरम्यान,रेल्वे सुरक्षा रक्षक गेटमन चंद्रकांत कांबळे यांची गोळीबार करून हत्या का करण्यात आली,याचा अंदाज अजून बांधता आलेला नाही,त्याबाबत तपास सुरू केला आहे,असे कोलाड पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी सांगितले,
रेल्वे फाटकावर गेटमन म्हणून कामावर असलेले पाले बुद्रुक येथील चंद्रकांत कांबळे हे दुपारी जेवण करत होते. त्याचवेळी अज्ञात ईसमाने चंद्रकांत कांबळे यांच्यावर गोळी झाडली. कपाळावर गोळी लागल्याने चंद्रकांत कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. गोळीबार करणारा अज्ञात ईसम फरार झाल्याचे समोर आले.गोळीबाराचे वृत्त कळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *