धर्माधिकारी महाविद्यालयात टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी महाविद्यालयात टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
कोलाड,(प्रतिनिधी)
येथील तटकरे चारिटेबल ट्रस्ट संचालित डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवे कोलाडचे संस्थेचे ट्रस्टी मा.श्री.संदीपजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 01 ऑगस्ट 2023 रोजी राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वास देशमुख, उपप्राचार्या नेहल प्रधान,कार्यालय अधीक्षक मा. श्री अमोल गोलीपकर, राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. पडवळ प्रतीक्षा, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. पवार अश्विनी आदी उपस्थित होते. प्रथमत: लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले व महाविद्यालयातील विदयार्थ्यांनी आपले विचार मांडले तसेच डॉ. सावळे सरांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांचे आदर्श आजच्या पिढीने घेतले पाहिजे तसेच समाज सुधारण्यासाठी आज अशा महापुरुषांची आवश्यकता आहे असे यावेळी विचार मांडले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *