
कोलाड येथे सप्ताह सोहळ्याची सांगता
कोलाड दि.१६( कल्पेश पवार )
रोहा तालुक्यातील कोलाड येथे बेळगांव निवासीनी परमपूज्य आई श्री कलावती देवी यांच्या कृपाशीर्वादाने श्री हरीमंदिर, बेळगांव यांच्या मार्गदर्शनानुसार ता.८ जाने. सुरू करण्यात आलेल्या
जप सप्ताह सोहळ्याची ता.१२ जाने.रोजी सांगता करण्यात आली.
या सप्ताह सोहळ्यात नियमित चालणारी उपासना (ज्ञानेश्वर मंदिर, हॉटेल मराठाच्या मागे, आंबेवाडी नाका) सोमवार, मंगळवार, शनिवार, रविवार सायंकाळी ४ ते ५.३० वा वेळेत वारांचे भजन व वाचन सोमवार, मंगळवार – सायंकाळी ७ ते ८ वा. या वेळेत नित्योपासना तसेच गुरुवार सायंकाळी ७ ते ८ वा. या वेळेत वारांचे भजन, रविवार सकाळी ८ ते ९ वा. या वेळेत बाळगोपाळांसाठी बालोपसमा (पारावरील गणपती मंदिर, वरसगांव नाका येथे)
परमार्थमार्गप्रदीप भाग पहिला या पुस्तकातील नित्याचे स्मरण भजन व परमपूज्य आईंनी सांगितलेल्या उपासने बद्दल माहिती देणे. रात्री ९.०० ते १०.३० वा. श्रीहरिप्रेमलहरी या पुस्तकातील पुण्यतिथी, सायं, स्मरण भजन व चरित्रामृतसाराचे वाचन. रविवार दिनांक १२/०१/२०२५ रोजी सायंकाळी ०६.०० ते ०७.१५ या वेळेत बालोपासनेच्या बाळ गोपाळांकरीता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.१३/०१/२०२५ रोजी सकाळी ७ ते ८.३०वा. गुरुमायगुणगान ने सप्ताहाची सांगता करण्यात आली .