
पालखी महोत्सवाने यज्ञ नाप जप सप्ताह सोहळ्याची सांगता
खांब,दि.१३(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील उडदवणे येथील स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे स्वामी समर्थ मानव विकास अध्यात्मिक केंद्र अंबरनाथ यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली ता.८ जाने. सुरू करण्यात आलेल्या स्वामी समर्थ यज्ञ नाप जप सप्ताह सोहळ्याची ता.१२ जाने.रोजी पालखी महोत्सवाने सांगता करण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांची यशस्वी परंपरा राखत
व याही वर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न करण्यात आलेल्या या सप्ताह सोहळ्यात दररोज नियोजित वेळेनुसार भुपाळी, नित्य स्वाहाकार,नैवद्य आरती,औदूंबर प्रदक्षिणा आदी धार्मिक कार्यक्रमांसह ब्रह्मीभूत प.पू.गुरूवर्य आण्णासाहेब म्हस्के यांनी रचलेल्या व अस्मिताताई म्हस्के यांच्या उपस्थितीत स्वामीगीतांचा कार्यक्रम आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम भक्तीभावाने साजरे करण्यात आले.तर सप्ताहाची सांगता पालखी महोत्सव व श्री सत्यनारायणाची महापूजा, महाआरती व महाप्रसादाने करण्यात आली.
तर या सोहळ्यास रोहा-अष्टमी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातील मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून विविध कार्यक्रमांचा लाभ घेतला.तर सर्व सोहळ्याचे यशस्वीतेसाठी उडदवणे ग्रामस्थ व महिला मंडळ तसेच तरूण मंडळ यांच्यासह स्वामीभक्त यांनी मोलाचे सहकार्य केले.