
धानकान्हे बैलगाडी शर्यतीत संतोष गायकर यांच्या बैलगाडीने पटकावली मानाची ढाल
खांब,दि.२०(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील हौशी बैलगाडी संघटना धानकान्हे यांच्या वतीने संपन्न झालेल्या जिल्ह्यास्तरीय भव्यदिव्य स्वरूपातील बैलगाडी
शर्यतीत उडदवणे येथील शर्यतीत संतोष गायकर यांची बैलगाडी फायनल गटात पहिली येऊन मानाच्या ढालीवर आपले नाव कोरले.तर याच माती बंदरावर संतोष गायकर यांच्या बैलगाडीने हॅटट्रिक मारली.
उपसरपंच सूरज कचरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आलेल्या या स्पर्धेप्रसंगी
पो.पाटील पांडुरंग कचरे,माजी सरपंच महादेव माहित, डॉ.बालाजी वाखरकर,शाम लोखंडे , दयाराम भोईर,नितिन कचरे,राकेश थळकर,रमेश गोवर्धने,चंद्रकांत लहाने,कमलेश शिंदे, निलेश कचरे,सुदाम जाधव, ज्ञानेश्वर जाधव,भाई कचरे, नामदेव देवकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत संपुर्ण जिल्ह्यातून जवळपास शंभर बैलगाडी चालक व मालक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून या स्पर्धेची चूरस वाढविली.तर स्पर्धेतील फायनल गटात अहमद सलमान पठाण (श्रीगाव)आणि राक्षिकर बंधू(नवखार) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.फायनल गट व अन्य गटातील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी आदेश गायकवाड,निलेश देवकर, कल्पेश गायकवाड, अशोक देवकर,सूरज आंबेतकर, आदित्य गायकवाड,संयोग गायकवाड, साहिल साबळे,ऋतिक आतोणकर, अनिल जाधव, विश्वास राऊत, निलेश कचरे,उमेश कचरे, प्रशांत गायकवाड, नितिन कचरे,राकेश थळकर, प्रमोद गायकवाड, सुजित कचरे आदींनी मोलाचे सहकार्य केले.