एम डी एन फ्यूचर स्कूल मध्ये रंगला “खेळ पैठणीचा”
कोलाड-कल्पेश पवार
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने रोहे तालुक्यातील कोलाड एम डी एन फ्यूचर स्कूल मध्ये रविवार दि.१०मार्च रोजी खेळ पैठणीचा व हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आखलेला हा महिला पालकवर्गासाठी चा खेळ पैठणी व आणि हळदी कुंकू सोहळा रविवार दि. १० मार्च रोजी उत्साहात संपन्न झाला. रायगड चे लाडके भाऊजी म्हणून सध्या प्रसिद्ध असलेले निनाद शिंदे ह्यांनी कार्यक्रमाला एक वेगळाच रंग दिल.उखाणे स्पर्धा, संगीत खुर्ची, तळ्यात मळ्यात असे कित्तेक राऊंड नंतर १० महिला निवडून त्यांतून ३ विजेते असा हा खेळ जवळ जवळ दोन अडीच तास रगला. कोलाड मोहल्ल्यातील महजबिन हाफिज हिने पैठणी जिंकून सर्वोत्कृष्ट स्पर्धक्यचा मान पटकावला, तर चांदीची अन्नपूर्णा मूर्ती रोठ रोहा इथल्या सौ.रुचित मोर ह्यांनी द्वितीय क्रमांक पटकावून जिंकली तसेच कोलाड इथल्या सौ. मेधा साळी ह्यांनी तिसरे क्रमांक पटकाऊं मीक्सर ब्लेंडर जिंकला. लकी ड्रॉ मध्ये १० बक्षिसे जिंकणाऱ्या महिलांनी सुद्धा जल्लोष केला. प्रश्न मंजूषा आणि उखाणे स्पर्धे मध्ये सहभागी होणाऱ्या उत्साहित महिलांना आकर्षक बक्षिसे मिळाली.
सोहळ्या साठी संदीप तटकरे व रुतूजा तटकरे ह्याची प्रमुख उपस्थिती लाभली. संस्थेचे चेअरमन आणि व्हाईस चेअरमन म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहिलेच सोबत सर्व माता भागीनसोबत संपूर्ण इव्हेंट ची मजा घेतली.‘आजच्या काळातील यशस्वी कारकीर्द सांभाळणाऱ्या माता भगिनी, आज असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे स्त्रीया आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवत नाहीत, यशस्वी होऊन दाखवतातच’ असे आपल्या भाषणात संदीप तटकरे ह्यांनी म्हटले.तसेच येत्या काळात महिला पालक वर्गांसाठी शाळेमध्ये मार्शल आर्ट, लाठीकाठी, आर्थिक साक्षरता, डान्स प्रशिक्षण कम्प्युटर प्रशिक्षण व यांसारख्या कार्यशाळा घेण्यात येणार आहे असे जाहीर केले.
कार्यक्रमास वेगवेगळ्या सामाजिक कार्यांमध्ये आपलं कर्तुत्वाचा ठसा उमटविणाऱ्या मान्यवर कर्तुत्ववान स्त्रियांनी आमंत्रणस मान देऊन उपस्थिती दर्शवली. या सर्व कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष संदीपजी तटकरे उपाध्यक्ष. त्रुतूजा तटकरे, सचिव प्रकाश सरकले, रजिस्ट्रार अजित तेलंगे यांचे मार्गदर्शन लाभले. या संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळली ती शाळेच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर देवेंद्र चांदगावकर व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती योगिनी देशमुख यांनी. त्यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली समन्वयक शिक्षक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी यानी अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम पार पडला व खऱ्या अर्थाने ०८ मार्च जागतिक महिला दिन हा आठवणीतील दिवस म्हणून साजरा करण्यात आला.