गणराज मंडळाने स्व खर्चातून केली रस्त्याची दुरुस्ती !

चिंचवली आदिवासी वाडी ते विठ्ठलवाडी रस्ता झाला खराब
गणराज मंडळाने स्व खर्चातून केली रस्त्याची दुरुस्ती !
रोहा-कोलाड- कल्पेश पवार
                  ग्रामीण भागात राजकीय नेते लक्ष देत नसल्याने येथे अनेक सुविधा जनतेला मिळत नाही.त्यातच चिंचवली आदिवासी वाडी ते विठ्ठलवाडी रस्ता झाला खराब झाला असल्याने येथील गणराज मित्र मंडळाने स्व खर्चातून रस्त्याची दुरुस्ती केली आहे.
             रोहे तालुक्यातीळ दुर्गम भागातील लोक वस्ती असलेला विठ्ठलवाडी गावापासून चिंचवली आदिवासी वाडी पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झालेला असून रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले होते .या पडलेल्या खड्याकडे लोक प्रतिनिधी व शासकीय यंत्रणा नेचा लक्ष नसल्याने येथील नागरिकांची गैर सोय होत आहे. त्यातच
दि. २०/०३/२०२४ व दि. २१/०३/२०४ आमलकी ऐकादशी ह्या दिवशी विठ्ठलवाडी गावामध्ये विठ्ठल रखुमाई उत्सव व अखंड हरिनाम यज्ञ साजरा होत आहे.
या कार्यक्रमाकरीता विठ्ठलवाडी ग्रामस्थ व पंचक्रोशी मधील वारकरी सांप्रदाय मोठया संख्येने आवर्जुन उपस्तिथ असतात.विठ्ठल-रखुमाई उत्सवाच्या सोहळयासाठी विठ्ठलवाडी गावातील गणराज मित्र मंडळ दर वर्षी विविध नव नविन उपक्रम राबवित असतो. विठ्ठलवाडी गावापासून चिंचवली आदिवासी वाडी पर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झालेला असून रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.तरविठ्ठल रखुमाई उत्सव सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. जनतेची वाव  भाविकांची गैरसोय होऊ नये या करीता गणराज मित्रमंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या गणराज मित्र मंडळ कार्यक्रम व्यवस्थापन कमिटी मार्फत विठ्ठलवाडी गावापासुन चिंचवली आदिवासी वाडी पर्यंतच्या रस्त्यावर पडलेले खड्डे बुरुम मातीने भरण्याचे काम गणराज मित्र मंडळाचे अध्यक्ष संजय  चोरगे, उपाध्यक्ष कु.प्रफुल्ल चिकणे, खजिनदार  निलेश  चिकणे व सचिव  समित  धनावडे तसेच सर्व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम व्यवस्थापन कमिटी प्रमुख कु. विशाल भास्कर चोरगे, उपप्रमुख कु. किशोर सखाराम गायकवाड, कार्याध्यक्ष कु. ॠतिक लक्ष्मण धनावडे व अर्थ व्यवस्थापक कु.राज रामदास आमले तसेच गावातील व शेजारील गावातील मुलांनी केलेले आहे.
              सदर कामाचे पंचक्रोशीतील नागरिकांनी कौतुक केले. तसेच या रस्त्याने दररोज एस. टी. घेऊन येणाऱ्या एस.टी.व्यवस्थापनाच्या कर्मचार्‍यांनी याबाबत सर्व मुलांचे विशेष आभार मानून रस्त्यावर टाकण्यात आलेले बुरुम माती व्यवस्थित बसावी म्हणुन मदत देखील केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *