कोलाड विभागात साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
१३ सार्वजनिक तर १९ घरगुती गणरायाचे विसर्जन
कोलाड, दि.३ (कल्पेश पवार)
अनंत चतुर्थी नंतर येणारा साखरचौथ गणेशोत्सव कोलाड विभागातील विविध गावांमध्ये सार्वजनिक तसेच घरगुती स्वरूपात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ता.२ सप्टेंबर रोजी सकाळी साखरचौथ गणेशोत्सव अंतर्गत घरोघरी गणरायांचे आगमण झाल्यावर यथोचित पूजा आर्चा,महाआरती आदी कार्यक्रम संपन्न करण्यात आले. तर सायंकाळी हरिपाठ, जागर भजन तसेच महिला मंडळाचे मनोरंजनाचे कार्यक्रमही पार पाडण्यात आले.या कार्यक्रमातंर्गत ठिकठिकाणी उत्साहाचे वातावरण दिसून आले.तर या दिवसाचे उत्सव प्रसंगी विविध प्रकारचे कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली.
.तर ता.३ सप्टेंबर रोजी सायंकाळी उशिरापर्यंत साखरचौथ १३ सार्वजनिक तर १९ घरगुती गणरायाचे विसर्जन सार्वजनिक तलाव,नदीमध्ये करण्यात आले.