तटकरे तंत्रनिकेतन येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त
प्रतिसाद !
कोलाड दि.(कल्पेश पवार )
रोहा तालुक्यातील तटकरे चॅरिटेबलं ट्रस्ट संचालित श्रीमती गीता.द.तटकरे तंत्रनिकेतन,कोलाड गोवे येथे बुधवार दि.०४ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला होता.सदर शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला
यावेळी तटकरे चॅरिटेबल ट्रस्ट चे विश्वस्त संदीप तटकरे,शासकीय रक्तपेढी अलिबाग चे डॉ दीपक गोसावी.तंत्रनिकेतनचे प्राचार्य विपुल मसाल, रजिस्ट्रार अजित तेलंगे,सिव्हिल विभाग प्रमुख प्रियंका जामकर,नानासाहेब धर्माधिकारी चे प्राचार्य डॉ विश्वास देशमुख,ITI चे प्राचार्य संजय हजारे,शासकीय रक्तपेढी अलिबाग चे सहकारी,सर्व शाखेचे विभाग प्रमुख,व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ असा विविध सामाजिक संघटनांतर्फे प्रचार आणि प्रसार करण्यात येत असला तरी रायगड जिल्ह्यात रक्तदात्यांची संख्या गेल्या काही वर्षांत कमी झाल्यामुळे रुग्णांना पाहिजे त्या प्रमाणात रक्त पुरवठा होत नसल्याने श्रीमती गीता.द.तटकरे तंत्रनिकेतन,कोलाड या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते व विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभतो तसेच यावेळी सदर शिबिरात रक्ताच्या ६० पिशव्या रक्त संकलित करण्यात आल्या आहेत.
सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व विभाग प्रमुख सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सिव्हिल विद्यार्थी संघटना यांनी परिश्रम घेतले.