वारकरी पांडुरंग गोविलकर यांना देवाज्ञा
खांब,दि.७(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील कृषीनिष्ठ बाहे गावातील कृषीनिष्ठ शेतकरी तथा वारकरी व सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. पांडुरंग जानू गोविलकर यांना शनि.दि.५ आॅक्टोबर रोजी राहत्या घरी वयाच्या सुमारे ६५ व्या वर्षी अल्पशा आजाराने देवाज्ञा झाली.
ह.भ.प. पांडुरंग गोविलकर हे कृषीनिष्ठ शेतकरी म्हणून सर्व परिचित होते.तर आपल्या आयुष्यात वारकरी संप्रदायाला स्वतःला वाहून घेतले होते.त्यांच्या दु:खद निधन समयी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी समाजातील विविध स्तरांतील नांगरिक व त्यांचे आप्तस्वकीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुलगे,दोन मुली,जावई, नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी सोम.दि.१४ आॅक्टोबर रोजी तर अंतिम धार्मिकविधी गुरू.दि.१७ आॅक्टोबर रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.