महात्मा गांधी जयंती निमित्त डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांनी कोलाड परिसर केला चकाचक
कोलाड-कल्पेश पवार
डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा -अलिबाग यांच्या मार्फत डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या आज्ञेने व डॉ.श्री.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी जयंती निमित्त रविवार १ ऑक्टोबर रोजी कोलाड येथील श्री सदस्यांनी विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबिवले..
या अभियानाकरीता कोलाड पोलीस स्टेशन मधील अजित साबळे,आंबेवाडी सरपंच सुरेश महाबले, उपसरपंच कुमार लोखंडे,कोलाड हायस्कूल चे प्राचार्य,तिरमाले सर,प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी च्या वैद्यकीय अधिकारी दर्शना वरुठे,डॉ वैभव तिवडे,ग्रामपंचायत सदस्य जगनाथ धनावडे,यांच्या सह परिसरातील नागरिकांनी डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान,रेवदंडा यांचे आभार मानले.
स्वच्छता हि सेवा या अभियान अंतर्गत रविवारी दि. १ ऑक्टोबर रोजी कोलाड हायस्कूल येथून सकाळी ९ ;३० वाजता सुरू स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली यावेळी कोलाड येथील १.रोहा रोड (मराठा पॅलेस ते पालेबुद्रुक स्टॉप) २.आठवडा बाजार ३.मुंबई गोवा हायवे (मच्छी मार्केट ते श्रीसद्गुरू कृपा हॉल, पुई) ४.कोलाड हायस्कूल रोड ५.सरकारी दवाखाना,६.पोलीस स्टेशन ७.लघु पाटबंधारे उपविभाग कार्यालय व वसाहत (पुई कॉलनी) येथे झाडू,कोयते,पंजा,घमेल,वापरून परिसरात स्वच्छता मोहीम राबवली टॅक्टर,वाहने ,जे.सी.बी.च्या साहयाने ओला ८.३५० टन सुका,६७० किलो इतक्या कचऱ्याची व्हिलेवाट लावली. या मोहिमेत ३७८ श्री सदस्यांनी सहभाग घेतला.