रोहे तालुक्यामध्ये पाच दिवसीय गौरी गणपती बाप्पांचे भक्तिमय व शांततामय वातावरणात विसर्जन…
# गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..या जयघोषाने आसमंत दुमदुमले..
खारी/रोहा (केशव म्हस्के) २४ सप्टेंबर:-
सकळ बुद्धीदाता,सुखकर्ता दुःख हर्ता विघ्नहर्ता,संकट मोचक चौदा विद्या,चौसष्ट कलांचा अधिपती गणराज गणपती बाप्पांचे आगमन भाद्रपद शु.४ गणेश चतुर्थी ला मंगळवार दि.१९ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात घरोघरी,सार्वजनिक पद्धतीने सर्वत्र झाले की त्यामध्ये मुख्यतः काही आवडीने तर काही नवसाचे वाड- वडीलांपासून परंपरागत वारसा पद्धतीने चालत आलेले गणपती बाप्पांचे आणि गौरी मातेचे मोठ्या थाटामाटात उत्साही आनंददायी वातावरणामध्ये आगमन झाले….
यावर्षी मात्र खाडा नसल्याने मोजून चार च दिवस आणि पाचव्या दिवशी बाप्पांसमवेत गौरी मातेची सेवा करण्याची संधी मिळाली..
पूर्वापार प्रथेनुसर दीड दिवसीय गणपती बाप्पांना विशेष: त्वाने फार महत्त्व असायचे त्यापैकी काही गणपती बाप्पांच्या गणेश भक्त गणांनी आपल्या लाडक्या बाप्पाच्या रजेत वाढ करून पाच,दहा,एकवीस दिवस हौसे,नवसे, ठेवण्याची प्रथा दृढ झाली.
आपल्या आराध्य लाडक्या दीड दिवसीय बाप्पांचे आगमन मनोभावे पूजा आरती प्रार्थना,बाप्पांना आवडत्या उकडीच्या मोदकाचे नैवद्य – पुरणाची पोळी,दुग्धाची खीर सह भजन – पूजन,नाच – गाणी जागर गणपती बाप्पांचे दुसऱ्या दिवशी बुधवार दि.२० सप्टेबर रोजी वरून राजाने देखील सकाळ पासूनच दमदारपणे जोरदार सुरुवात केल्याने विसर्जन मिरवणूक न काढता कोणतीही अधिक रिस्क न घेता दिवसे-उजेडी भावपूर्ण भक्तिमय अंत:करणाने निरोप देण्यात आले तर गुरूवार रोजी गौरी मातेचे आगमन,शुक्रवारी पूजन, घरोघरी हरिपाठ भजन जागर,महिलांचे पारंपरिक नाच गाणी शनिवार दि.२३ सप्टेंबर रोजी पाच दिवसीय गणपती बाप्पा,गौरी मातेला भावपूर्ण भक्तीमय अंत:करणाने देवा बाप्पा गणराया आमचे काही चुकले असेल,तर आम्हांला माफ करा,गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया पुढल्या वर्षी लवकर या…अनंदिदायी अश्रूंनी मनोभावे पूजा आरती प्रार्थना करून निरोप देत वर्षभरामध्ये मनोसंकल्पित मनोकामना,ईच्छा-आकांक्षा पूर्ण होवोत बाप्पा तुझ्या कृपाशिर्वादाने सर्व विघ्न दूर जावून आमच्या जीवनामध्ये यश,कीर्ती, सुख- समृध्दी निरंतर मन:शांती, समाधानाचे,सुखाचे दिवस यावेत अशी मनोभावे प्रार्थना करीत आपल्या बाप्पांना भावपूर्ण भक्तिमय,आनंददायी वातावरणात निरोप देत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.. या जयघोषाने कुंडलिका नदी पत्रामध्ये, तर काही ठिकाणी सार्वजनिक तलावामध्ये गणपती मूर्तींचे विसर्जित करण्यात आले..
यावर्षी मात्र बऱ्याच जणांनी घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी चांद्रयान -३ चे यशस्वी लँडिंग चे चलचित्र साकार करून आपण अध्यात्मिक व धार्मिक असून बदलत्या व प्रगतशील माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात जगत असताना आपण विज्ञानवादी देखील असल्याचे दाखविण्याचे प्रयत्न करून सिद्ध केले..
यावेळी विसर्जन प्रसंगी रोहे नगर पालिका तसेच वरसे,रोठ खुर्द, धाटाव – किल्ला,खारी – खारगाव, आरे बुद्रुक – गोफण – चणेरा, कोलाड-वरसगाव- नागोठणे आदी ग्राम पंचायत हद्दीमध्ये ग्राम पंचायत वतीने निर्माल्य कलश,गणेश भक्तांना पिण्यासाठी पाणी व्यवस्था आणि विसर्जन स्थळी नदी पत्रामध्ये सुरक्षितरित्या जाता यावे म्हणून नगर पालिकेचे व महावितरपणाचे विद्युत पुरवठा अधिकारी व कर्मचारी वर्ग देखील उपस्थित होते शिवाय कोणताही अनुचित प्रकार घटना घडू नये,शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी रोहे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गर्शनाखाली ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते…