महिला बस मधून प्रवास करीत असताना चोरी सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास !

महिला बस मधून प्रवास करीत असताना चोरी सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास !
कोलाड-कल्पेश पवार
                      सविता पांडुरंग शेडगे सध्या राहणार मनीषा नगर कळवा ठाणे या सोमवार दि.१३मे रोजी माणगांव येथून ठाणे येथे बस ने जात असताना प्रवासादरम्यान माणगांव ते कोलाड असा प्रवास चालू असताना एकूण 1,40,200 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरांनी लंपास केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.या घटनेमुळे  
प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरले असून  प्रवाशांची सुरक्षा राम भरोसे ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या बाबत  मिळालेली अधिक माहिती अशी की,सविता पांडुरंग शेडगे मालूस्टे माणगांव
सध्या राहणार मनीषा नगर कळवा ठाणे या सोमवार दि.१३मे रोजी माणगांव येथून सकाळी १०:४५च्या सुमारास श्रीवर्धन ते ठाणे या एस टी बस ने माणगांव येथून ठाणे येथे जात असताना माणगांव ते कोलाड प्रवासा दरम्यान त्याच्या कडील असलेल्या पर्स मधील 60000 रू कींमतीचे 1.5 तोळे वजनाचे सोन्याचे गंधन, 20000 रू कींमतीचे 5 ग्रॅम वजनाचे कानातले सोन्याची फुले 20000 रू किंमतीचे 5 ग्रॅम वजनाचे कानातली सोन्याची चैन जु वा की सु, 20000 रू किमतीचे 3 सोन्याचे अंगठया एक 2 ग्रॅम वजनाची व दोन प्रत्येकी दीड ग्रॅम वजनाची जु वा की सु. 20,200 रोख रक्कम त्यात 500 रू दराच्या 36 नोटा व 100 रू दराच्या 8 नोटा 200 रू दराच्या 7 नोटा असे एकुण 1,40,200 रू किंमती चे सोने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे.या चोरीच्या घटनेमुळे प्रवाशांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
                    सदर गुन्हा बाबत तक्रार कोलाड पोलीस ठाण्यात टपालाने प्राप्त झाली असून कोलाड पोलिसात यांची नोंद ००५१/ २०२४ भा.द .वी .कलम ३७९ प्रमाणे करण्यात आली असून कोलाड पोलीस अधिकारी नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील चोरीचा तपास चौधरी नेम,करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *