कोलाड येथे अखंड नामयज्ञ सोहळ्याचे आयोजन
कोलाड-कल्पेश पवार
।। जय जय रामकृष्ण हरी ।।
कोलाड विभाग वारकरी सांप्रदायाच्या विद्यमाने शुक्रवार दि.१७/०५/२०२४ ते वैशाख शनिवार दि.१८/०५/२०२४ रोजी कै.द.ग. तटकरे माध्यमिक विद्यालय कोलाड हायस्कूल कोलाड,ता. रोहा,येथे
अखंड नामयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी पहाटे ४ ते ६ काकड आरती, ७ ते ८ सर्व मंगल विधी, ९ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण, सायं. ५ ते ७ • सामुदायिक हरिपाठ, सायं. ७ ते ९ हरिकिर्तन, रात्रों १११ नंतर सामुदायिक जागर
शुक्रवार दि. १७/५/२०२४ रोजी दुपारी १२ ते २ वा. :- महाप्रसाद सौजन्य कु.श्रीरंग गणेश दिघे (गोवे)
सायं. ७ ते ९ वा. :-किर्तन – वारकरी भूषण ह.भ.प.श्री. चैतन्य महाराज नाशिककर सौजन्य – सौ.प्रितमताई पाटील (महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस रोहा तालुका)
रात्रौ ९ ते ११ वा. :-महाप्रसाद सौजन्य कोलाड विभाग वारकरी सांप्रदाय कोलाड तर शनिवार दि. १८/५/२०२४ रोजी सकाळी १० ते १२ वा. :- काल्याचे किर्तन- भाषाप्रभू ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज पाटील (वानप्रस्थ उपासना क्षेत्र सरळांबे शहापूर-ठाणे)
सौजन्य – ह.भ.प. राम महाराज आंबेकर (पुई कॉलनी)
दुपारी १२ वा. :- काल्याचा महाप्रसाद सौजन्य-कै. सुनंदा सिताराम महाडीक व कै. सिताराम रामजी महाडीक (चिंचवली) यांच्या स्मरणार्थ यांचे नातू कौस्तुभ, शुभम, इंद्रानी यांज कडून किर्तन साथ :- कोलाड विभाग व रोहा तालुका वारकरी सांप्रदाय तर
यावेळी प्रमुख उपस्थिती
मा.खा.श्री. सुनिलजी तटकरे साहेब (मा. खासदार, रायगड – रत्नागिरी) मा.आ.कु. आदितीताई तटकरे
(महिला व बालविकास मंत्री, महाराष्ट्र राज्य)
मा.आ.श्री. अनिकेतभाई तटकरे (मा. आमदार विधान परिषद) मा.श्री. राकेशभाई शिंदे (युवा कार्यकर्ते)
मिष्टान्न :- ह.भ.प. श्री. अनिल सानप, श्री. मारूती मालुसरे, श्री. किशोर मालुसरे, धावीर भक्तरोहा
हॅडबिल सौजन्य: ह.भ.प. श्री. गणपत रा. गोरीवले बॅनर सौजन्य: श्री. सुधीर भोसले सप्ताहासाठी लागणारी हार, फुलः ह.भ.प.श्री. रामचंद्र गं, महाबळे दोन दिवस नाष्टा ह.भ.प. श्री. गणेश नलावडे देणार असून या अखंड नामयज्ञ सोहळ्याची तयारी
कोलाड विभाग वारकरी सांप्रदाय करीत आहेत.