रोहा तालुक्यातील विद्यार्थीसाठी सुट्टीतील
नवसंकल्प शिबिर प्रशिक्षण उत्साहात संपन्न
खांब,दि.११(नंदकुमार मरवडे)
ज्ञान प्रबोधिनी पुणे, एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि श्री. विवेकानंद रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा, यांच्या संयुक्त विद्यमाने या वर्षी नव्याने सुरु केलेल्या ‘विकास मित्र प्रकल्प’ अंतर्गत ‘नवसंकल्प शिबीर’ 2024 या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी शिक्षक व निवडक विद्यार्थी गटासाठी करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन विवेकानंद रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहाचे प्रमुख व एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड (सीएसआर प्रमुख ) सुशील रूळेकर यांच्या हस्ते करण्यात केले. याप्रसंगी ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधिका चे प्रकल्प प्रमुख ऋतूजा देशमुख, ओंकार बाणाईत, श्रीरंग टोके, प्रथमेश कुलकर्णी उपस्थित होते.तर या शिबिरात रोहा तालुक्यातील मुख्यतः ग्रामीण भागातील १४ शाळांमधील प्रत्येकी १ ते २ शिक्षक व २ ते ४ विद्यार्थी असे एकूण ५० शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
या प्रशिक्षण वर्गामध्ये सुरवातीला गंमत व छोटे खेळ या पासून झाली. नाविन्यपूर्ण वैज्ञानिक खेळणी आणि विज्ञान संकल्पना विविध कृती द्वारा विद्यार्थी कडून करून घेण्यात आल्या. कागदी फुले तयार करणे, पेपर टोपीचे विविध प्रकार करण्याचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांच्या गटाने विविध गट कार्य केली, स्वतःच्या क्षमता स्वयंशोध चाचणी च्या साह्याने जाणून घेतल्या. 14 शाळांमध्ये या प्रशिक्षणाचा उपयोग करून विविध सत्र घेतली जाणार आहेत. या शिबिरांमध्ये विविध स्पर्धा, योगा – सूर्यनमस्कार, विविध छोट्या खेळांच्या माध्यमातून विद्यार्थ्याना नवीन गोष्टींची माहिती करून दिली जाणार आहे, गावातील स्थानिक नावीन्यपूर्ण प्रयोग करणारे शेतकरी, व्यावसायिक इत्यादी व्यक्तींच्या मुलाखती योजल्या जाणार आहेत. पद्य – प्रार्थना व मैदानी खेळ याचे प्रशिक्षण व साहित्याचे संच शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्याना प्रशिक्षणात देण्यात आले.
रोहा तालुक्यातील मुख्यतः ग्रामीण भागातील 14 शाळांमधील प्रत्येकी 1 ते 2 शिक्षक व 2 ते 4 विद्यार्थी असे एकूण 50 शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले होते.
सहभागी शाळा पुढील प्रमाणे –
श्री. रा. ग. पोटफोडे मास्तर विद्यालय व कै. द. ग. तटकरे कनिष्ठ महाविद्यालय खांब, न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठल वाडी – राजखलाटी, श्रमिक विद्यालय चिल्हे, कृष्णाजी संभाजी गोरीवले माध्यमिक विद्यालय तीसे पंचक्रोशी, माध्यमिक शाळा तळाघर, द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय विरजोली, द ग तटकरे माध्यमिक विद्यालय भालगाव, महात्मा गांधी विद्या मंदिर चोरढे, सर्वोदय विद्यालय सुड्कोली, न्यू इंग्लिश स्कूल शेणवई, सानेगुरुजी विद्यानिकेतन सानेगाव, सु. ए. सो. अष्टमी हायस्कूल, को. ए. सो. मेढे विभाग इंग्रजी शाळा मेढे व प.पु. पांडुरंग शास्त्री आठवले विद्यालय धाटाव.या प्रशिक्षण वर्गात प्रशिक्षण घेतलेले शिक्षक व विद्यार्थी पुढील दोन दिवस दिनांक 12 व 13 एप्रिल 2024 ला त्यांच्या शाळेमध्ये नवसंकल्प शिबिर आयोजित केले आहे. यात सुमारे 1000 हून अधिक विद्यार्थ्यानी नोंदणी केली आहे. हे शिबिर सर्वांसाठी पूर्णतः मोफत आहे. या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन विवेकानंद रिसर्च अॅन्ड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट रोहा चे प्रमुख व एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड (CSR प्रमुख ) मा. श्री. सुशिल रूळेकर सर यांनी केले. याप्रसंगी ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधिका चे प्रकल्प प्रमुख ऋतूजा देशमुख, ओंकार बाणाईत, श्रीरंग टोके, प्रथमेश कुलकर्णी उपस्थित होते. याप्रसंगी सुशिल सरांनी ‘ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यासाठीची गरज ओळखून उन्हाळी सुट्टी अधिक नेमकेपणाने समृद्ध होण्यासाठी या शिबिराचा उपयोग होणार आहे’ असे सांगितले. त्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यानी यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे त्यांनी आवाहन केले.
तसेच याप्रसंगी सहभागी शाळांमधील श्रमिक विद्यालय चिल्हे व द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय विरजोली या शाळांनी मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळेत उपक्रमात मिळविलेल्या यशाबद्दल भेट देवून कौतुक करण्यात आले. त्याच सोबत द. ग. तटकरे माध्यमिक विद्यालय विरजोली चे अमोल पाटील, सर्वोदय विद्यालय सुड्कोलीचे भरत चौधरी यांचा ज्ञान प्रबोधिनी, शिक्षण प्रबोधन दूत योजनेतील विशेष कामासाठी सत्कार करण्यात आला.
या प्रशिक्षण वर्गात विविध सत्रांचे मार्गदर्शन ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक उपक्रम संशोधिका, पुणे येथील ओंकार बाणाईत, श्रीरंग टोके, ऋतूजा देशमुख, प्रथमेश कुलकर्णी, संपदा शिर्के, तेजल नवशे यांनी केले. व्ही आर टी आय संस्थेतील सदस्य हर्षदा दगडे, श्री. प्रसाद भोईर व टीम यांनी या शिबिराचे संयोजन केले.