पोलीस अधिकारी नितीन मोहिते यांची दमदार कामगिरी

कोलाड पोलिसांची दमदार कामगिरी !

हरवलेल्या मुलाचा अवघ्या ३ तासात घेतला शोध
कोलाड (कल्पेश पवार)
                        कोलाड आयटीआय कॉलेज गोवे येथे शिक्षण घेत असलेला साहिल संजय पाटील हा सोमवार दि.८एफिल रोजी दुपारी जेवणाचे सुट्टी मध्ये कोणालाही काही एक न सांगता कुठेतरी निघून गेला होता याबाबत पालकांची तक्रार कोलाड पोलीस ठाण्यात येताच  कर्तव्य दक्ष कोलाड पोलीस अधिकारी नितीन मोहिते
यांनी तपासाची सूत्रे वेगवान हलवत हरवलेल्या मुलाचा अवघ्या ३ तासात शोध लावला आहे.कोलाड पोलीस अधिकारी नितीन मोहिते व त्यांच्या सर्व टिम च्या दमदार
कामगिरीवर त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
                      याबाबत अधिक माहिती अशी की,सोमवार दि. 08/04/2024 रोजी गोवे आयटीआय कॉलेज मध्ये शिकत असलेला साहिल संजय पाटील वय 18 वर्ष 4 महिने मूळ राहणार फोफेरे ता. अलिबाग जिल्हा रायगड सध्या राहणार गोवे फाटा पोस्ट कोलाड तालुका रोहा जिल्हा रायगड हा गोवे कॉलेज येथे आयटीआयचा विद्यार्थी असून दुपारी जेवणाचे सुट्टी मध्ये कोणालाही काही एक न सांगता कुठेतरी निघून गेला तो सायंकाळी पुन्हा न आल्याने व त्याची बॅग तसेच शालेय साहित्य कॉलेजमध्येच ठेवून गेल्याने संध्याकाळपर्यंत परत न आल्याने त्यांचे आई-वडील यांना मोबाईल द्वारे फोन करून कळविण्यात आले त्याप्रमाणे त्याचे आई-वडील गोवे कॉलेज येथे येऊन त्याचा शोध घेतला असता मिळून आल्याने त्याबाबत त्यांनी कोलाड पोलीस ठाण्यात मुलगा साहिल संजय पाटील हा हरवले बाबत तक्रार दिली ती कोलाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून सदरची मिसिंग नंबर 07/2024 अशी असून मिसिंग दाखल केल्यानंतर लगेच कोलाड पोलीस ठाण्याचे रविवारी अधिकारी नितिन मोहिते  साहेब व स्टाफ अशाने लगेच मिसिंगचा शोध सुरू केला तसेच त्याचे मोबाईल लोकेशन पाहिले असता तो सायंकाळी 04 वाजेपर्यंत चालू असल्याचा व 04 वाजता त्याचे लोकेशन पेण येथे असल्याचे समजले त्यानंतर पुन्हा मिसिंग मुलगा त्याचे मोबाईल फोन सीडीआर व लाईव्ह लोकेशन पाहिले असता सदरचा मुलगा हा दिवे रेल्वे स्टेशन येथे असल्याबाबत खात्री झाल्याने मुलगा यांचे नातेवाईकांसह दिवा रेल्वे स्टेशन येथे जाऊन सदर मुलगा यास ताब्यात घेऊन त्यांचे चे आई-वडिलांचे ताब्यात देण्यात आलेला आहे.
                    सदर मिसिंग मुलाची तक्रार दिल्यानंतर अवघ्या तीन तासांमध्ये सदर मुलाचा शोध घेऊन आई-वडिलांचे ताब्यात घेण्यात आलेला आहे तरी सदरचा मुलगा हा कॉलेजमधून का निघून गेला होता याबाबत कोलाड पोलीस ठाणे पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *