रेल्वेची धडक लागून तरुणाचा मृत्यू

रेल्वेची धडक लागून तरुणाचा मृत्यू
कोलाड : कल्पेश पवार
                    रेल्वेची धडक लागून एका तरुणाचा दुर्देवी अंत झाल्याची घटना सोमवारी ( ता. २५ ) रोजी दुपारी २:३० वा. च्या सुमारास कोलाड जवळील पाले खुर्द गावाच्या हद्दीत घडली आहे. विशाल बाळकृष्णा जाधव ( वय ३० रा.पाले खुर्द ता. रोहा)असे मयत तरुणाचे नाव असून सोमवारी दुपारी रेल्वे कोलाड येथील कि.मी १०/१२ रेल्वे रूळावरून नेत्रावती एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनल ते थिरूअनंतपुम गाडी नंबर १६३४५ ही गाडी जात असताना या गाडीची ठोकर लागून सदर तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.याबाबत कोलाड पोलीस ठाण्यात आकस्मित मुत्यु अशी नोंद करण्यात आली असून कोलाड सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास कोलाड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *