कोलाड आंबेवाडी येथे राहणारे मारुती सावंत पनवेल येथून बेपत्ता
परिसरात कोणाला आढळून आल्यास संपर्क साधण्याचे नातेवाईकांचे आहवान
कोलाड-कल्पेश पवार
कोलाड आंबेवाडी मूळ गाव येथे राहणारे मारुती लक्षुमन सावंत हे सोबती दारासोबत पेंशन च्या कामानिमित्त बेलापूर वरून काम वाटपुन घरी येत असताना पनवेल रेल्वे स्टेशन वरून बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत परेश विजय कडव, वय 27 वर्षे,मु संभे, कोलाड यांनी पनवेल रेल्वे पोलीसात दिलेल्या फिर्यादी नुसार समक्ष पनवेल रेल्वे पोलीस ठाणेत हजर राहून जबाब देतो की, दि.14.03.2024 रोजी मी व माझे काका नामे मारुती लक्ष्मण सावंत, वय 75 वर्षे, मु.आंबेवाडी, ता रोहा, जिल्हा रायगड.असे आम्ही काकांच्या पेशंनच्या कामाकरीता नागोठणे रेल्वे स्टेशन येथून सुमारे 11.20 वा DMU गाडीने पनवेल रेल्वे स्टेशन येथे आलो व तेथून वाशी रेल्वे स्टेशन येथे त्यांच्या पेशनच्या ऑफिसमध्ये गेली परंतु तेथून सदरचे ऑफिस हे बेलापुर येथे गेल्याचे समजल्याने आम्ही परत बेलापुर रेल्वे स्टेशन येथे आलो.
तेथील त्यांचे काम करुन आम्ही परत नागोठणे येथे जाणेसाठी पनवेल रेल्वे स्टेशन फलाट क्र 06 वर सुमारे 15.30 न. आलो. मी मारुती सावंत यांना फलाट क्र 06 वर बाकड्यावर बसवून लोकल लाईच्या बाथरुमला गेलो.परत येऊन पाहिले असता ते बाकड्यावर बसलेले नसल्याने मी फलाटावर सर्वत्र त्यांचा शोध घेतला परंतु ते कोठेही मिळून आले नाही माझ्या काकांना दारुची नशा करण्याची सवय असल्यामुळे ते परत घरी येतील या आशेवर आम्ही होतो परंतु आनी सर्व नातेवाईक,मित्रमंडळी यांचेकडे चौकशी केली असता ते कोठेही मिळून न आल्याने व आद्यापावेतो घरी न आल्याने माझे काका नामे मारुती लक्ष्मण सावंत, वय 75 वर्षे, राह- गाव आंबेवाडी, ता रोहा, जिल्हा रायगड. है मिसींग असलेबाबत तक्रार देत आहे. काकाचे वर्णन खालील प्रमाणे
वर्णन- ऊंची 5 फुट 5 इंच, अंगाने सडपातळ, रंगाने सावळा,चेहरा उभा, नाक-सरळ, डोळे काळे, केस काळे बारीक ओळखचिन्ह- काही नाही
कपडे- अंगात चौकडीचा पांढ-या रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व नेसणीस- ग्रे रंगाची फुल पॅन्ट
सामान- बँक ऑफ इंडिया बँकेचे पासबुक, आधारकार्ड
तरी दिनांक-14/03/2024 रोजी सुमारे 15.30 वा. पासुन अद्यापपर्यत माझे काका कुठेतरी निघून गेले व ईलरत्र ठिकाणी शोध घेतला व नातेवाईकांकडे चौकशी केली. परंतु ते मला कोठेही मिळुन आले नाही.
त्या बाबत पनवेल रेल्वे पोलिस ठाणे येथे 0007/2024 अशी मिसिंग नोंद करण्यात आली आहे.तरी कोणाला आढळून आल्यास त्यांनी
9359647146 या नंबर वर संपर्क साधावा