कोलाड येथील गोड्या नदीच्या पुला खाली इसमाचा आढळला मुत्यु देह !

कोलाड येथील गोड्या नदीच्या पुलाखाली बेवारस इसमाचा आढळला मुत्यु देह !
या इसमाचे कोणी नातेवाईक असल्यास संपर्क साधण्याचे पोलिसांचे आव्हान
कोलाड दि.१३ ( कल्पेश पवार  )
                    कोलाड हायस्कूल जवळ असलेल्या गोदा नदीच्या पुलाखाली बुधवार दि.१३ मार्च रोजी सकाळ च्या सुमारास अनोळखी बेवारस पुरुष नदीच्या पाण्यात तरंगत आढळून आल्याची घटना कोलाड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
             तरी या इसमाचे कोणी नातेवाईक असल्यास पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधण्याचे आव्हान कोलाड पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी केले आहे.
              तरी या बाबत मिळालेल्या अधिक माहिती नुसार ,मौजे आंबेवाडी कोलाड गावचे हद्दीत कोलाड 
हायस्कूल च्या पुढे असणाऱ्या गोदा नदीच्या पुलाखाली 
बुधवार दि.१३ मार्च रोजी सकाळ च्या सुमारास बेवारस अनोळखी पुरुष ईसमाचा मुत्यू देह आढळून आला.तरी हा मुत्यु देह पाण्यात बुडून तरंगत मिळून आला असून
              हा इसम कोण आहे,येथे कशाला आला होता, हा अपघात आहे की घातपात अशी उलट सुलट चर्चा नाक्यात होती.परंतु हा इसम बेवारस असून त्यांचा मुत्यु पाण्यात बुडुन झाला असावा अशी प्राथमिक माहिती कोलाड पोलिसांनी दिली आहे.
            तरी या घटनेची नोंद कोलाड पोलिसात आकस्मिक मृत्यु ०४/२०२४ सी आर पी सी  १४७
अशी करण्यात आली असून या पुढील तपास कोलाड सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी,गायकवाड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *