मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रा.गटात केंद्र शाळा कोलाड द्वितीय
खांब,दि.१०(नंदकुमार मरवडे)
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविलेला उपक्रम मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभिनव स्पर्धेत प्रा.गटात रोहा तालुक्यातील केंद्र शाळा कोलाडने द्वितीय क्र.पटकावला आहे.
मुख्याध्यापिका श्वेता रिसबुड यांच्या नियोजनातून व येथील सीमा कळमकर, शुभांगी येरुणकर,प्रवीण घाग,मानसी जोशी,रुची सामंत,सपना थळे,नंदकुमार तेलंगे, नितीन पेडमकर व स्कूल कमिटी अध्यक्ष भरत महाबळे,उपाध्यक्ष व सर्व सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती कोलाड
श्री वाडेकर साहेब यांचा मौलिक सहभाग तसेच सरपंच कोलाड सौ. व श्री. सागवेकर यांचे सौजन्य.. ग्रामसेविका स सन्माननीय अर्चना चंद्रकांत पाटील मॅडम आणि सर्व सन्माननीय सदस्य ग्रामपंचायत.. सन्माननीय सर्व पालक वर्ग आणि ज्ञात अज्ञात सर्व मान्यवर यांच्या सहभागातून आज हा पुरस्कार युक्त सन्मान आमच्या शाळेला प्राप्त झाला आहे असे शाळेच्या पदोन्नती/उच्च श्रेणी मुख्याध्यापिका सन्माननीय सौ रिसबूड मॅडम यांनी याबाबत माहिती सांगितले.येथील शिक्षकवर्ग तसेच विद्यार्थी वर्गाच्या अथक परिश्रमानतून या शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा बहुमान पटकावला आहे.या उपक्रमांतर्गत परसबाग, प्लास्टिक मुक्त शाळा,शालेय परिसर, आरोग्य, स्वच्छता व शाळेतील वर्गखोल्यांची सजावट यातील गुणांच्या आधारे तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.तालुका गट शिक्षणाधिकारी मेघना धायगुडे यांचे तसेच केंद्रप्रमुख संगिता म्हात्रे मॅडम यांचे शाळेस सर्वच नेहमीच सर्वंच बाबतीत मोलाचे सहकार्य लाभत आहे.तर येथील मुख्याध्यापिका व सर्व शिक्षकवृंद शालेय व सहशालेय उपक्रमांबरोबरच विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी करीत असलेल्या प्रयत्नांतून विद्यार्थी वर्गाच्या गुणवत्तेचा आलेखही सतत चढताच राहिला आहे.तसेच येथील विद्यार्थी नेहमीच विविध प्रकारच्या स्पर्धा व उपक्रमात विविध स्तरांवर चमकदार कामगिरी करीत असल्याचे पहावयास मिळत आहे.तर केंद्रशाळेच्य या सुयशाबद्दल समाजातील सर्वच स्तरातून अभिनंदन व्यक्त होताना दिसत आहे.