सुकेळी येथून आई व मुलगा बेपत्ता परिसरात कोणाला आढळून आल्यास संपर्क साधण्याचे पोलिसांचे आहवान

सुकेळी येथून आई व मुलगा बेपत्ता परिसरात कोणाला आढळून आल्यास संपर्क साधण्याचे पोलिसांचे आहवान
कोलाड-कल्पेश पवार
                  जिंदाल हॉस्पिटल च्या बाजूला सुकेळी पाईप नगर येथे राहत असलेली दीपाली आविनाश राठोड वय -25 व मुलगा वेद राठोड वय 3 हे दि.28/02/2024 रोजी बेपत्ता झाले आहेत.
               याबाबत अधिक माहिती अशी की,
अविनाश मोहन रातोड वय 30 वर्ष, व्यवसाय नोकरी, रा एमएसएल कॉलनी एच 2 रूम नं 1 जिंदाल हॉस्पीटलचे बाजुला सुकेळी पाईपनगर ता.रोहा जि रायगड मुळ रा मन्सुतांडा, पो.सावरगाव नसरत ता. लोहा, जि. नांदेड यांनी पोलीसाद दिलेल्या फिर्यादी नुसार,
                त्यांची पत्नी दिपाली अविनाश राठोड वय 25 वर्ष, मुलगा साई अविनाश राठोड वय 08 वर्ष, वेद अविनाश राठोड वय 3 वर्ष असे एकत्र राहतो.
दिनांक 28/02/2024 रोजी सकाळी 08.00 रात्री 08.00 असा ड्युटीवर होतो दुपारी 12.30 वाजण्याचे सुमारास मी जेवणा साठी घरी येताना माझा मोठा मुलगा साई याला स्कुल मधून घरी घेहून येत आलो असता
घराच्या दरवाजाला कुलूप होता.
                    म्हणून मी माझ्या कडील चावीने दरवाजा उघडला व पत्नी दिपाली कुठे गेली आहे याची चौकशी करण्या करीता तिचा मोबाईल नबर वर कॉल केला परंतू तिने कॉल उचलला नाही म्हणून मी पुन्हा फ़ोन केला तर  लहान मुलांकडुन कॉल उचलाला गेला परंतू पत्नीने तो कॉल लगेच कट केला त्यानंतर पुन्हा कॉल केला सेवा दिपालीचा मोबाईल स्वीच ऑफ येवू लागला आहे.तरी मी नातेवाईकांच्या कडे चौकशी केली असता ती आढळून आली नाही.
              हरवलेल्या पत्नीचे वर्णन खालील प्रमाणे दिपाली अविनाश राठोड वय 25 वर्ष, रम गोरा चेहरा उभट केस सरळ काळे व पफ काढलेले, कपाळ रूंद डोळे काळे व मोठे नाक सरळ कानामध्ये लहान कुड्या, गळ्यामध्ये मंगळसुत्र, अंगामध्ये काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस तसेच सोबत असलेला मुलगा वेद राठोड वय 3 वर्ष रंग गोरा सडपातळ असे वर्णन असून आई व मुलगा  परिसरात कोणाला आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आहवान नागोठणे पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *