चिंचवली तर्फे आतोणे ग्रामपंचायत हद्दीत आरोग्य व शासकीय योजनेच्या शिबिराचे आयोजन

चिंचवली तर्फे आतोणे ग्रामपंचायत हद्दीत आरोग्य व शासकीय योजनेच्या शिबिराचे आयोजन !
कोलाड-कल्पेश पवार
                भाजप रोहा तालुका उप अध्यक्ष रवींद्र तारू यांच्या नेतृत्वाखाली रोहे तालुक्यातील चिंचवली तर्फे आतोणे ग्रामपंचायत हद्दीत माजी सरपंच छाया रवींद्र तारू यांच्या आयोजनातून शनिवारी दि.९ मार्च रोजी जय फार्म राजीव अमृते हंडेवाडी येथे शासकीय योजना व मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आहवान कार्यकर्ते रविंद्र तारू यांनी केले आहे.
         सुराज्य सामाजिक प्रतिष्ठान ,उन्नती हॉस्पिटल आय सी यु पनवेल यांच्या सहकार्याने भाजपचे रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग उप अध्यक्ष रवींद्र तारू यांच्या माध्यमातून मोफ़त आरोग्य शिबिर व शासकीय योजनेच्या शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी या शिबिरात मुतखडा, दुर्बिणीच्या माध्यमातून उपचार मूत्रपिंड, मूत्रमार्ग उपचार पौरुष ग्रथी,डायलिसिस,तसेच पॅन कार्ड, इश्रम कार्ड,प्रधानमंत्री किसान योजना,अभा कार्ड,प्रधान मंत्री सुरक्षा योजनेच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
          कार्यक्रम प्रमुख संतोष शिर्के,संजय मुसळे,राहुल पडवळ,दयाराम महाडिक अनिल शेडगे,अशोक महाडिक, सुनील घोसाळकर,मंगेश आमुस्कर सुरेश महाडिक, रोशन बरस्कर,यशवंत शेढगे,आनंत विठ्ठल शिर्के ,हे मेहनत घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *