वारकरी संप्रदायाचे नामदेव सावंत यांना देवाज्ञा
खांष,दि.२(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील डोलवहाल गावचे रहिवासी तथा साक्षरता कार्यकर्ते असणारे व वारकरी संप्रदायाचे पाईक ह.भ.प.नामदेव देवजी सावंत यांना बुध.दि.२८ फेब्रुवारी रोजी राहत्या निवासस्थानी अल्पशा आजाराने वयाच्या देवाज्ञा झाली.
स्व.ह.भ.प.नामदेव सावंत यांनी वारकरी संप्रदायाची मनापासून भक्ती करून आपल्या हयातीत बांधकाम व्यावसायिक व कुशल शेतकरी म्हणून आपल्या प्रपंचाचा गाडा हाकला.आपली मुले व नातवंडे यांच्यावर चांगले संस्कार केले.समाजात कार्यरत राहून नेहमीच समाज व आपल्या गावासाठी चांगले योगदान दिले.त्यांच्या दु:खद निधनाचे वृत्त समजताच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्यासह त्यांचे आप्तस्वकीय मित्रपरिवार यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.
त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली,सुना,जावई, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी शुक्र.दि.८ मार्च रोजी तर अंतिम धार्मिकविधी विधी सोम.दि.११ मार्च रोजी राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.