तटकरे परिवाराचे संघर्षाच्या काळात
चिल्हे ग्रामस्थांनी मोठी ताकद दिली
खांब/कोलाड,दि.१(नंदकुमार मरवडे/कल्पेश पवार)
तटकरे परिवाराचे संघर्षाच्या काळात
चिल्हे ग्रामस्थांनी मोठी ताकद दिली असल्याचा आवर्जून उल्लेख खा.सुनील तटकरे यांनी चिल्हे येथे ता.२९ रोजी संपन्न झालेल्या कार्यक्रमात केला.
रोहा तालुक्यातील चिल्हे येथील
आदिवासी वाडीतील रस्ता व साकव,जलजिवन मिशन पाणीपुरवठा योजना, व्यायामशाळा, अंतर्गत रस्ता,प्रा.शाळा वर्गखोल्या आदी विकासकामांसह श्री.शंकर मंदिराचे लोकार्पण सोहळा खा.सुनील तटकरे व राज्यमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांनी वेळोवेळी उपलब्ध करून दिलेल्या विकासनिधीतून करण्यात आला.यावेळी खा.सुनील तटकरे उपस्थितांसमोर आपले मनोगत व्यक्त करताना बोलत होते.याप्रसंगी
ह.भ.प.पुरूषोत्तम महाराज पाटील, जेष्ठ नेते अर्जून कचरे, रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे, महेंद्र पोटफोडे, नरेंद्र जाधव,मनोज शिर्के,वसंत मरवडे,प्रितम पाटील,कांचन मोहिते,सुरेखा पार्टे,सरपंच रविंद्र मरवडे, उपसरपंच संदीप महाडिक, प्रमोद लोखंडे, प्रमोद शिंदे,उमेश लोखंडे,सहादेव महाडिक, शांताराम महाडिक, मारूती खांडेकर,नाना शिंदे,तुकाराम कोंडे, तुकाराम महाडिक, संतोष महाडिक,विलास शिंदे, विनायक शिंदे, सुरेंद्र महाडिक, अनिल महाडिक, जितेंद्र महाडिक,किशोर महाडिक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
स्व.विठोबा शिंदे,स्व.गोविंदराव महाडिक,स्व.नामदेव गोपाळ लोखंडे ते आतापर्यंतच्या कालावधीत तटकरे परिवार आणि चिल्हे ग्रामस्थ यांचे परस्परांशी असलेलें घनिष्ठ संबंध आणि त्याच माध्यमातून गावाचा झालेला विकास व यापुढील विकास कामांसाठी आम्ही तटकरे परिवार सदैव कटिबध्द असल्याचे आवर्जून उल्लेख शेवटी त्यांनी केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद शिंदे यांनी केले.सुत्रसंचलन नंदकुमार मरवडे यांनी तर सहादेव महाडिक यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.