एम.बी.पाटील स्कूलमध्ये दहावी विद्यार्थी शुभेच्छा सन्मान सोहळा संपन्न

एम.बी.पाटील स्कूलमध्ये दहावी विद्यार्थी शुभेच्छा सन्मान सोहळा संपन्न
खांब,दि.२९(प्रतिनिधी)
रोहा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एम.बी.पाटील स्कूलमध्ये दहावी विद्यार्थी शुभेच्छा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
हॉयबाख कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर तथा रोहा प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष व सल्लागार
पराग फुकणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी रविंद्र आयनोडकर,पालक प्रतिनिधी रविंद्र आयोनडकर, देशपांडे सर,मछिंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते,अतुल पाटील, मुख्याध्यापिका सौ.देसाई आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.या कार्यक्रमात स्वरा नांदगावकर,आचल भायदे, प्राप्ती मोरे,प्रिंन्स सिंग,प्रणव चौधरी, शर्वरी पाटील आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करून शाळा आणि शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.तर येथील शिक्षक रुकसाना सय्यद ,दिप्ती माळी यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थी वर्गाला संबोधित केले.या कार्यक्रमास स्कूलमधील सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विनोद कुथे यांनी केले.तर मुख्याध्यापिका सौ.देसाई यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करून हॉयबाख कंपनीने आतापर्यंत
एम.बी.पाटील स्कूलसाठी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबदवदद्ल कंपनीचेही आभार व्यक्त
कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *