नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा

नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा माध्यमिक गटात श्रमिक विद्यालय चिल्हे प्रथम”

खांब,दि.२५(नंदकुमार मरवडे)
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविलेला उपक्रम मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभिनव स्पर्धेत नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे या विद्यालयाने
तालुकास्तरावर माध्यमिक गटात प्रथम क्रमांक पटकावला असून सदरील विद्यालय जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे.
संस्थेचे चेअरमन महेंद्र पोटफोडे यांच्या तसेच सर्व संस्था चालकांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापक दिपक जगताप यांच्या नियोजनातून येथील शिक्षक नरेंद्र माळी, राजेश म्हात्रे,शिवनाथ दराडे,संजय आंधळे,अमोगसिद्ध सुरवसे,महेंद्र जवरत, अनुराधा मोरे, ज्योत्स्ना सबरदंडे,अमित डाके, नंदकुमार मरवडे,सुनील थिटे, पांडुरंग शिद, प्रविण मरवडे, चंद्रशेखर कांबळे, शशिकांत महाडिक, रेश्मा शिंदे आदी सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारीवर्ग व विद्यार्थी वर्गाच्या अथक परिश्रमानतून विद्यालयाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा बहुमान पटकावला आहे.
या उपक्रमांतर्गत परसबाग, प्लास्टिक मुक्त शाळा,शालेय परिसर, आरोग्य, स्वच्छता व शाळेतील वर्गखोल्यांची सजावट यातील गुणांच्या आधारे तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.विद्यालयाच्या या सुयशाबद्दल समाजातील सर्वच स्तरातून अभिनंदन व्यक्त होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *