ऊरूस मैदानावरील सभेपेक्षा आमची पंचक्रोशीची गर्दीच कैकपटीने सरस ठरली आहे-खा.सुनील तटकरे

ऊरूस मैदानावरील सभेपेक्षा आमची पंचक्रोशीची गर्दीच कैकपटीने सरस ठरली आहे
खा.सुनील तटकरे
खांब,दि.३(नंदकुमार मरवडे)
सातबारा कोरा करणा-यांनी तुमच्या ऊरूस मैदानावरील सभेपेक्षा आमची तालुक्याची नव्हे तर केवल खांब पंचक्रोशीतील सभेची गर्दीच सरस ठरली असून ही गर्दी पाहून घ्या आणि फुकटच्या वल्गना कराव्यात अशा शब्दात खा.सुनील तटकरे यांनी सातबारा कोरा करणा-या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
रोहा तालुक्यात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्री.रा.ग.पोटफोडे(मास्तर) विद्यालय व द.ग.तटकरे कनिष्ठ महाविद्यालय खांब या संकुलनाचे नुतन इमारतीचे लोकार्पण सोहळा
खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते व राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न करण्यात आला.यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना खा.सुनील तटकरे विशाल जनसमुदायाला संबोधित करताना बोलत होते.
यावेळी चेअरमन महेंद्र पोटफोडे,जेष्ठ नेते नारायण धनवी,रामचंद्र चितळकर, प्रकाश थिटे, भाई पोटफोडे ,बाबुराव बामणे,राम कापसे, धोंडू कचरे,राम मरवडे,सुरेश महाबळे, दयाराम पवार, मारूती महाराज कोलाटकर, वसंत मरवडे, नंदकुमार कापसे, गजानन भोईर,संजय भिसे, बाळाराम धामणसे, हरिश्चद्र धामणसे,भाऊ पोटफोडे,विजय पवार ,धनाजी लोखंडे, मारूती खांडेकर,नरेंद्र जाधव, नरेंद्र पवार,मनोज शिर्के, विश्वनाथ धामणसे,विजय कामथेकर,प्रितम पाटील,कांचन मोहिते,वीणा चितळकर,सिद्धी राजिवले, सुप्रिया जाधव,
वृषाली मांडलुस्कर,नेहा म्हसकर,निलम कलमकर,रंजिता जाधव,विशाखा राजिवले,
,रविंद्र मरवडे,दत्ता वातेरे,राजेश कदम,गजानन बामणे, प्रमोद म्हसकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
चेअरमन महेंद्र पोटफोडे व सर्व संचालक मंडळ यांनी या सभेची जय्यत तयारी केली असल्याने हजारोंच्या संख्येने जनसमुदाय या सभेला उपस्थित होता.यावेळी पुढे खा.सुनील तटकरे यांनी बहुजन समाजाचे हित हे यशवंतराव चव्हाण यांचे ब्रीद त्याच हेतूने उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या माध्यमातून सत्तेमध्ये सहभागी झालो असल्याचे स्पष्ट करताना या विभागाचे आणि तटकरे परिवाराचे जिव्हाळ्याचे नाते आहे.त्यामुळे या विभागाच्या आणि शिक्षण संस्थेच्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नसल्याचे आश्वासन उपस्थितीतांना दिले.तर राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी संस्थेच्या विकासासाठी खुप मोठे योगदान आम्हाला देता आल्याने कृतार्थपणाची भावना व्यक्त करताना खांब पंचक्रोशीने वेळोवेळी अधिकाधिक मताधिक्य देऊन तटकरे परिवाराचे जिव्हाळ्याचे नाते जपले आहे.तर एक लाख दहा हजार अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोन,पेन्शन योजना, डॉ.आनंदीबाई जोशी मोफत आरोग्य शिबिर व महिलांना सक्षम करण्यासाठी भविष्यकाळात विविध योजना राबविण्यात येणार असल्याचे शेवटी सांगितले.यावेळी चेअरमन महेंद्र पोटफोडे व संचालक प्रकाश थिटे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महेंद्र तुपकर यांनी केले.तर नरेंद्र माळी यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *