बनावट सातबारा तयार करून जमिनीची परस्पर विक्री !दोन आरोपी सह तत्कालीन तलाठी वर गुन्हा दाखल !

बनावट सातबारा तयार करून जमिनीची परस्पर विक्री !
दोन आरोपी सह तत्कालीन तलाठी वर गुन्हा दाखल !
कोलाड-कल्पेश पवार
             कोलाड येथे दोन आरोपी यांनी तत्कालीन तलाठी यांना हाताशी धरून संगणमत करून बोगस बनावट 7/12 तयार करून जमीन विकल्याने
दोन आरोपी सह तत्कालीन तलाठी वर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
                         याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार 06/06/2021 रोजी 12:30 वा ते दि. 30/01/2024 रोजी 12:30 वा च्या दरम्यान मौजे तलाठी कर्यालय कुडली ता.रोहा येथे फिर्यादी रा.11 हनुमान को ऑप ,सोसायटी पाशाण सोस रोड पाशाण, जि.पुणे हे जमिनीचे मालक असताना सदर मिळकतीचा 7/12 उतारा संगणीक करणारा तलाठी सजा कुडली यांना आरोपीत 02 यांना हाताशी धरून संगणमत करून बोगस बनावट 7/12 तयार करून क्षेत्र 9/95/0 हे आर पैकी 0/80/0 इतके जमिन परस्पर दिपीका दिपक चिपळुणकर रा 101 जैयराम अपार्टमेंट दमखाडी ता.रोहा जि.रायगड यांनी विकलेली आहे तसेच 38/1/अ ही जमिन पुस्कर रामचंद्र जैन रा प्लाप्ट नंबर 5 मजला वात्सल्ये हाथकेस सोसायटी जी व्ही पी डी स्कीम , एम.एन.रोड नंबर 6 विले पार्ले पश्चिम मुंबइ यांना गहाणखतावर ठेवलेली मसुदा ड्राफ्ट तयार केला.
          याबाबत कोलाड पोलीस ठाणे येथे गु.र.नं.06/2024 भा.दं.वि.क.420, 465, 467, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि नितिन मोहिते यांनी घटनास्थळी पाहणी केली असून,
अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखा रायगड अलिबाग मार्फत व्ही डी.शिद हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *