विठ्ठलवाडी विद्यालयात क्रीडा साहित्याचे वाटप !

विठ्ठलवाडी विद्यालयात क्रीडा साहित्याचे वाटप

जिग्नेश कनकिया, सुरेश कनकिया चॅरीटेबल ट्रस्टचा स्तुत्य उपक्रम

खांब,दि.२९(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित न्यू इंग्लिश स्कूल विठ्ठलवाडी -राजखलाटी येथे शैक्षणिक साहित्य व क्रीडा साहित्याचे वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
जिग्नेश कनकिया, सुरेश कनकिया चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या सहयोगाने व सुधीर मराठे व रोशन बारस्कर यांच्या सौजन्याने व सहकार्याने विद्यालयात क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुधीर मराठे,छाया मराठे, रोशन बारस्कर, लक्ष्मण धनावडे,सादुराम पवार, हनुमंत महाडिक,किसन कळंबे,संकेत बारस्कर, मुख्याध्यापिका अर्चना मरवडे,सहा.शिक्षक गौतम जाधव, सुप्रिया जाधव, ऋषिकेश महाडिक, सुजित लोखंडे, नितेश पोटफोडे आदी उपस्थित होते.जिग्नेश कनकिया, सुरेश कनकिया चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या सहयोगाने व सुधीर मराठे व रोशन बारस्कर यांच्या सौजन्याने व सहकार्याने विद्यालयात आतापर्यंत विद्यालयात विविध बाबतीत नेहमीच चांगल्या प्रकारचे सहकार्य करण्यात आले आहे.त्याच अनुषंगाने क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले असल्याने विद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *