गावदेवी चषकावर धाक्सुद चिल्हे संघाने आपले नाव कोरले

गावदेवी चषकावर धाक्सुद चिल्हे संघाने आपले नाव कोरले
उत्कृष्ट गोलंदाज संकेत लहाने उत्कृष्ट फलंदाज विजय खामकर तर सामनावीर म्हणून अमर महाडिक याचा गौरव

खांब,दि.२९(नंदकुमार मरवडे)
रोहा तालुक्यातील धानकान्हे येथील गावदेवी क्रीडा मंडळ धानकान्हे यांच्या वतीने व खांब क्रिकेट असोसिएशनच्या सहयोगाने संपन्न झालेल्या विभागीय क्रिकेट स्पर्धेत धाक्सुद चिल्हे
या संघाने अंतिम सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करून गावदेवी धानकान्हे चषकावर आपले नाव कोरले.
      येथील पो.पाटील पांडुरंग भाऊ कचरे,मा.सरपंच महादेव माहीत,प्रदीप जाधव,सुनील जंगम, दिलीप कचरे, सुशिल साबले, राकेश थळकर,नरेश कचरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या या स्पर्धेत विभागातील मोठ्या प्रमाणावरील संघांनी सहभाग घेऊन स्पर्धेतील उत्साह वाढविला.तर राॅयल किंग शिरवली या संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले व स्पर्धेतील तृतीय क्रमांक भाई भाई खांब या संघाने पटकावले.स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून संकेत लहाने शिरवली,उत्कृष्ट फलंदाज म्हणून विजय खामकर खांब तर सामनावीर म्हणून अमर महाडिक चिल्हे यांना तसेच सर्व विजयी संघांना उपसरपंच सूरज कचरे, प्रदीप माहित,चंदू गोसावी,महेश कचरे, पांडुरंग हळदे, निलेश टवळे,मनोज थिटे,अजय भोसले आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.या सामन्याचे समावलोचन विश्वास जाधव व सचिन जाधव यांनी केले.तर सामन्यांचे
यशस्वीतेसाठी गावदेवी क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *