
सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांची ओळख होते
पो.नि.अजित साबळे
खांब-कोलाड,दि.६(नंदकुमार मरवडे/कल्पेश पवार)
शालेय स्नेहसंमेलन तथा सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांची ओळख होत असल्याचे मनोगत कोलाड सहा.पो.नि.अजित साबळे यांनी व्यक्त केले.
नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब या शिक्षण संस्थेच्या श्री.रा.ग.पोटफोडे(मास्तर)
विद्यालय खांब व कै.द.ग.तटकरे कनिष्ठ महाविद्यालय खांब
ता.रोहा येथे ता.६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर चेअरमन महेंद्र पोटफोडे, संचालक रामचंद्र चितळकर,कोलाड पोलीस नरेश पाटील, कृष्णराम धनवी, सरपंच
कांचन मोहिते,उपसरपंच दत्ता वातेरे, मुख्याध्यापक सुरेश जंगम,जेष्ठ समाज सेवक तुळशीराम कांबळे, सागर मोरे, अभिजित वरखले, तुकाराम धामणसे, बाळाराम भोसले,विलास कांबळे,सुमित जाधव,ग्रा.पं.सदस्य सुरेखा पार्टे, ममता जैन,हर्षा जैन,निलिम कलमकर आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना सहा.पो.नि.अजित साबळे यांनी घरोघरी मोबाईल असल्याने मुलांच्या करिअरवर परिणाम होऊ लागला असल्याने मुलांना मोबाइल पासून शक्यतो दूर ठेवावे असे त्यांनी सांगितले.या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थी वर्गाने सादर केलेल्या सर्व कार्यक्रमांचे उपस्थित रसिक प्रेक्षकांनी मनमुरादपणे दाद देऊन विद्यार्थी वर्गाचे कौतूक केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.