रोहयात विविध ठिकाणी दत्त जयंती उत्सवाचे आयोजन..
    

रोहयात विविध ठिकाणी दत्त जयंती उत्सवाचे आयोजन..
आयोजकांनी केले भाविकांना आवाहन!
     रोहा : भुवनेश्वर येथे दत्तजयंती उत्सव
              प्रतिनिधी-/कल्पेश पवार :-
         सालाबादप्रमाणे यंदाहि भुवनेश्वर पंचायत समिती येथिल रामप्रकाश कुशवाह यांच्या निवास्थानालगत श्री दत्त मंदीरात मंगळवार दि. २६ डिसें. रोजी श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा ४० व्या वर्षांत पदार्पण करीत असलेल्या या उत्सवानिमित्त श्री सत्यनारायण महापुजेसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती सत्यदेव कुशवाह यांनी दिली. भाविकांनी दर्शन व सायंकाळी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे अवाहन करण्यात आले आहे. उत्सवसोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिराचे विश्वस्त रामप्रकाश कुशवाह यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सत्यदेव, रामेश्वर व ऍड. महेश यांच्यासह संपुर्ण कुशवाह परिवार परिश्रम घेत आहे.
—————–
किल्ला -अशोकनगर येथे रौप्य म्होत्सवी दत्तजयंती उत्सव
              रोहा दि. २५ डिसें. प्रतिनिधी : सालाबादप्रमाणे यंदाहि किल्ला अशोकनगर येथे मंगळवार दि. २६ डिसें. रोजी रौप्य म्होत्सवी श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त श्री सत्यनारायण महापुजा आणी महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती संजय पालकर यांनी दिली. भाविकांनी कोरोना पाश्वभूमीवर सुरक्षितता बाळगून दर्शन व तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. हा धार्मिक उत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी सल्लागार दिलिप पाबरेकर, संजय पालकर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष संदीप पालकर, किल्ला ग्रा. प. सदस्य नरेश चांदोरकर, गणेश चांदोरकर, अशोक चांदोरकर, जितेंद्र पालकर, विनोद चांदोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे पदाधिकारी ,आदींसह ग्रामस्थ आणी ओमकार मित्र मंडळाचे सदस्य परिश्रम घेत आहेत.
—————–
       रोहा : धाटाव येथे दत्तजयंती उत्सव
              रोहा दि. २५ डिसें. प्रतिनिधी :- सालाबादप्रमाणे यंदाहि धाटाव स्टॉप येथिल उद्योजक बापुशेठ लिंबोरे यांच्या निवास्थानी श्री दत्त मंदीरात मंगळवार दि. २६ डिसें. रोजी श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त श्री सत्यनारायण महापुजेसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती सचिन लिंबोरे यांनी दिली. भाविकांनी दर्शन व तीर्थ महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे अवाहन लिंबोरे परिवारा तर्फे करण्यात आले आहे. हा धार्मिक उत्सव सोहळा यशस्वी करण्यासाठी लिंबोरे परिवार परिश्रम घेत आहे.
 —————-
रोहा : त्रिमूर्तीनगर येथे दत्तजयंती उत्सव
              रोहा दि. २५ डिसें. प्रतिनिधी :- सालाबादप्रमाणे यंदाहि त्रिमूर्तीं नगर, धनलक्ष्मी बिल्डींग दमखाडी रोहा येथिल सकपाळ बंधू यांच्या रामछाया निवास्थानालगत श्री दत्त मंदीरात मंगळवार दि. २६ डिसें. रोजी श्री दत्त जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त श्री सत्यनारायण महापुजेसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहीती सकपाळ बंधू यांनी दिली. भाविकांनी दर्शन, तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *