लोकप्रतिनिधींच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ ; आमदार, खासदार व मंत्र्यांच्या निवास्थानी चोख पोलीस बंदोबस्त तैनात.
खासदार सुनिल तटकरे यांच्या घराजवळ पोलीस बंदोबस्त वाढविला
प्रतिनिधी/कल्पेश पवार :-
मराठा आरक्षणा संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आमरण उपोषण आदोलानंतर त्याचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. राज्यभरात विशेषतः मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलनाला गालबोट लागले आहे. विविध पक्षीय लोकप्रतिनिधी यांच्या घरांची आणि वाहनांची जाळपोळ करून रस्त्यावर टायर जाळून जमावा कडून आंदोलन करण्यात येत आहेत. त्यातच तीन दिवसापूर्वी ठाण्यात खा. सुनील तटकरे यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रकार घडला आहे. म्हणून सुरक्षेतेच्या दृष्टीने खा. सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे, आम. अनिकेत तटकरे व त्यांच्या कुटूंबियांना पोलीस बंदोबस्त देण्यात आले आहे. सुतारवाडी येथील खासदार सुनिल तटकरे यांच्या गीताबाग या निवास्थानी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले आहे. त्याच बरोबर रायगड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना विशेष संरक्षण देण्यात आले आहे, त्यामध्ये आम. महेंद्र दळवी आमदार महेंद्र थोरवे आम. भरत गोगावले आम. रवी पाटील आम.प्रशांत ठाकूर आम. महेश बालदी यांच्या निवास्थानी दोन पोलिस अधिकारी व दहा कर्मचारी असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे