कोलाड पोलीस ठाणे आयोजीत
निबंध स्पर्धेत खांब येथील संचिता गोळे प्रथम

कोलाड पोलीस ठाणे आयोजीत
निबंध स्पर्धेत खांब येथील संचिता गोळे प्रथम
कोलाड-कल्पेश पवार
                पोलीस स्मृतीदिनाचे औचीत्य साधून कोलाड पोलीस ठाणे यांजकडून खांब येथील रा.ग.पोटफोडे मास्तर विद्यालय व कै.द.ग.तटकरे कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय कार्यात पोलीसांचे महत्व या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यांत आली.
सदर स्पर्धेमध्ये संचिता सचिन गोळे हिने प्रथम क्रमांक, नुपूर राजेश म्हसकर हिने द्वितीय क्रमांक, स्नेहल गोरखनाथ देवकर हिने तृतीय क्रमांक तर तेजस्विनी बाळकृष्ण भोसले हिने उत्तेजनार्थं पारीतोषीक पटकावले. सदर स्पर्धेचा बक्षिस वितरण कोलाड पोलीस ठाण्याचे स.पो.नि. श्री. ओ.साबळे, शाळेचे प्राचार्य सुरेश जंगम सर यांचे हस्ते पार पडले. सदरची स्पर्धा यशस्वी होण्याकरीता शाळेतील बि.पी.म्हात्रे सर, ज्ञानेश्वर पोटफोडे सर, अनिल खांडेकर सर यांनी तर कोलाड पोलीस ठाण्यांतील गोपनिय पोलीस अंमलदार नरेश पाटील, पो.हवालदार वसंत शिद दत्ताराम महाडीक, कृष्णा म्हात्रे यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *