पोलीसांची शस्त्रे पाहून आदीवासी विद्यार्थि गेले हरकून

पोलीसांची शस्त्रे पाहून आदीवासी विद्यार्थि गेले हरकून
कोलाड-(कल्पेश पवार)
            पोलीस स्मृती दिनाचे औचीत्य साधून कोलाड पोलीसांकडून चिंचवली तर्फे आतोणे (गारबट)येथील जिल्हा परीषद शाळेमध्ये ता.३१/१०/२०२३ रोजी पोलीस दलामध्ये वापरली जाणारे असएलआर, पंप अॅक्शन गन, कार्बाईन, पिस्टल आदी हत्यारांची माहिती तसेच प्रदर्शन व हाताळणी विद्यार्थि विद्यार्थिनी यांना करुन देण्यांत आली.
      सदरची हत्यारांची हाताळणी करताना सदरचे विद्यार्थि हरकून गेले होते. सदरचे शस्त्रांचे प्रदर्शन व माहिती श्री.साबळे सहा.पोलीस निरीक्षक कोलाड पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एन.एन.चौधरी, गोपनिय पोलीस अंमलदार नरेश पाटील, पोलीस अंमलदार पांचाळ, महाडीक यांनी दिली. सदरवेळी शाळेचे मुख्याध्यापक आदर्श शिक्षक श्री.जाधव तसेच शिक्षकवृंद व ८०/९० विद्यार्थि विद्यार्थिनी हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *