कोलाड पोलीस स्टेशन येथे “नारी शक्तीचा”सन्मान

रोहा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोलाड पोलीस स्टेशन येथे “नारी शक्तीचा”सन्मान
कोलाड-(कल्पेश पवार)
                       खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, महिला व बालकल्याण मंत्री आदिती ताई तटकरे यांच्या संकल्पनेतून,आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या सहकार्याने रोहा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोलाड पोलीस स्टेशन येथे “उत्सव नवरात्रीचा सन्मान नारी शक्तीचा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
                     नवरात्री च्या निमित्ताने वेगवेगळय़ा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच आज कोलाड पोलीस स्टेशन येथे जाऊन महिला पोलिस यांचा नवदुर्गा सन्मान करण्यात आला. आज महिला कुठेही कमी नाहीत. ग्रामीण भागातील महिला सुद्धा आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करीत असतात.पोलिस विभागात काम करणाऱ्या महिला सुद्धा त्यांचे कर्तव्य काटेकोरपणे बजावत आहेत. विविध गुन्ह्यांमध्ये त्यांचे कार्य कौतुकास्पद आहेत. असे तालुका अध्यक्ष सौ  प्रितम पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. कोलाड पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री.अजित साबळे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी तालुका महिला अध्यक्षा सौ. प्रितम पाटील, पोलीस निरीक्षक साबळे साहेब, आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे,कोलाड सरपंच शर्मिला सागवेकर,आदिती झोलगे,मंदा पवार, सारिका खंडागळे, तसेच रिक्षा युनियन चे सर्व पदाधिकारी, चालक- मालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *