श्री धाविर महाराजांचा पालखी सोहळा!रायगड पोलिसांनी दिली सशस्त्र मानवंदना

श्री धाविर महाराजांचा पालखी सोहळा!
रायगड पोलिसांनी दिली सशस्त्र मानवंदना
सलामी सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी ; पालकमंत्री, मंत्री, खासदार, आमदारांची मंदिरात उपस्थिती!
    रोहा. दि. 25 ऑक्टो. कल्पेश पवार :- जिल्याचे श्रध्दास्थान आणि रोहयाचे ग्रामदैवत श्री धाविर महाराजांच्या पालखी सोहळ्यास बुधवारी पहाटे मोठया उत्साहात सुरूवात झाली. यावेळी रायगड पोलिसांच्या वतीने पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर व पथकाने श्री धाविर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली. हा सलामी सोहळा पाहण्यासाठी मंदिरात प्रचंड गर्दी झाली होती, यावेळी पालकमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, राजकिय पक्षांचे प्रमुख आणि शासनाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
सलामी सोहळा पाहण्यासाठी भल्या पहाटेपासून मंदिर परिसरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती, यावेळी पालकमंत्री उदय सामंत, सौ. निलम शिर्के सामंत, मंत्री अदिती तटकरे, खा. सुनिल तटकरे, आम. अनिकेत तटकरे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. प्रशांत देशमुख, कार्यवाह मकरंद बारटक्के, उत्सव समितीचे अध्यक्ष मयुर पायगुडे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस विजयराव मोरे, शिवसेना ठाकरे तालुकाप्रमुख समीर शेडगे, भाजपा तालुकाध्यक्ष अमित घाग, शिवसेना शिंदे तालुकाप्रमुख ऍड. मनोज शिंदे माजी नगराध्यक्ष लालताप्रसाद कुशवाह, संतोष पोटफोड़े, विश्वस्त नितिन परब, समिर सकपाळ, आनंद कुलकर्णी, महेश सरदार, संदीप सरफळे, आप्पा देशमुख, हेमंत कांबळे, अमित उकडे, राजेश काफरे, रविंद्र चाळके, निलेश शिर्के आदींसह ट्रस्ट आणि उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
या उत्सवानिमित्त मंदिराचा संपुण परिसर विविध रंगी फुलांच्या सजावटीने सजविण्यात आले होते, पाण्याचे उंच कारंजे आणि सुंदर रांगोळयांनी वातावरण प्रसन्न झाले होते. भल्या पहाटे मंगलमय वातावरणात गोंधळ्यांच्या वाद्याने ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली. पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर महाराजांची पालखी पारंपारिक वाद्यांच्या गजरात मार्गस्त झाली. शहरातील ठरलेल्या मार्गावर विविध ठिकाणी ग्रामस्तांना दर्शन देत पालखी दुसऱ्या दिवशी सकाळी मंदीरात परतणार आहे. यावेळी पून्हा महाराजांना पोलिस मनवंदना देण्यात येते, पालखीच्या स्वागतासाठी शहरात ठीकठीकाणी फुलांनी आणी सढारांगोळयांनी बहरलेले रस्ते आणी विशेष करून रात्रीच्या वेळी करण्यात येत असलेली रोषनाई या सोहळयाला एक वेगळे रूप प्राप्त करून देते, रोहयात पालखीच्या दर्शना सााठी येणाऱ्या भाविकांसाठी शहरात ठिकठिकाणी विविध सामाजिक मंडळांमार्फत थंड पेये आणि अल्पपोहाराची व्यवस्था करण्यात येते. येथिल अशिर्वाद मंडळातर्फे गेली अनेक वर्ष भाविकांसाठी मोफत भोजन व्यवस्था केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *